मुंबई मॅरेथॉनमध्ये इथियोपियाचा फडकला झेंडा By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2018 11:27 PM 2018-01-21T23:27:45+5:30 2018-01-21T23:35:25+5:30
15व्या मुंबई मॅरेथॉनमध्ये अपेक्षेप्रमाणे इथियोपियाच्या धावपटूंनी पुरुष व महिला गटात बाजी मारताना आपले वर्चस्व राखले.(सर्व छायाचित्रे- सुशील कदम)
गोपी थोनाकल, नितेंदर सिंग रावत या ऑलिम्पियन धावपटूंसह सेनादलच्याच श्रीनू बुगाथा यांनी अव्वल तीन स्थान पटकावताना अनुक्रमे सुवर्ण, रौप्य व कांस्य पदकावर कब्जा केला.
महिलांमध्ये ओलिम्पियन सुधा सिंगने निर्विवाद वर्चस्व राखताना २ तास ४८ मिनिटे ३२ सेकंदाची वेळ देत सुवर्ण पदकावर नाव कोरले.
भारतीय धावपटूंच्या पुरुष गटामध्ये सेनादलच्या धावपटूंनी अपेक्षित कामगिरी करताना एकहाती वर्चस्व राखले.
महिलांमध्ये ऑलिम्पियन सुधा सिंग आणि महाराष्ट्राच्या ज्योती गवते यांनी अपेक्षेप्रमाणे अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला.