निःशब्द ! सिरम इन्स्टिटयूटमधील भीषण 'अग्नितांडव'; पाच जणांनी गमावला आगीत होरपळून जीव By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2021 08:42 PM 2021-01-21T20:42:31+5:30 2021-01-21T21:09:16+5:30
मांजरी येथील सिरम इन्स्टिट्यूटच्या एसईझेडमधील इमारतीच्या चौथ्या व पाचव्या मजल्यावर आज दुपारी २ वाजून ३३ मिनिटांनी आग लागली. या आगीत इमारतीमधील ५ जणांचा होरपळून मृत्यु झाला. सहा मजली इमारतीतील वरच्या दोन मजल्यांवर इलेक्ट्रीक व पाईपिंगचे काम सुरु होते. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास येथील चौथ्या मजल्यावर आग लागली. त्याबरोबर आग आग असा कामगारी आरडा ओरडा केला. काही जण तातडीने बाहेर पडले. काही जणांनी तिसर्या मजल्यावरुन दुसर्या मजल्यावर उड्या मारुन आपला जीव वाचविला. ( सर्व छायाचित्रे : तन्मय ठोंबरे, लोकमत)
अग्निशमन दलाला दुपारी २ वाजून ३३ मिनिटांनी सिरम इन्स्टिट्युटमध्ये आग लागल्याची खबर मिळाली. त्याबरोबर अग्नीशमन दलाच्या १० गाड्या तातडीने घटनास्थळी रवाना झाल्या.
आग लागल्यानंतर मोठ्या प्रमाणावर धूर येत होता. धुराचे हे लोट काही किमी अंतरावरुन दिसत होते.
आगीचे दृश्य बघण्यासाठी घटना स्थळी नागरिकांची प्रचंड गर्दी
अग्निशमन दलाला दुपारी २ वाजून ३३ मिनिटांनी सिरम इन्स्टिट्युटमध्ये आग लागल्याची खबर मिळाली. त्याबरोबर अग्नीशमन दलाच्या १० गाड्या तातडीने घटनास्थळी रवाना झाल्या.
धुरामुळे जवानांना आत प्रवेश करणे अशक्य होत होते. जवानांनी इमारतीच्या खिडक्यांची काचेची तावदाने फोडली.
आगीचे स्वरुप लक्षात घेऊन अग्निशमन दलाकडील उंचावर पाण्याचा मारा करुन शकणार्या हॅड्रोलिक गाड्या आणण्यात आल्या. त्याच्या सहाय्याने पाण्याचा मारा करुन आग विझविण्याचा प्रयत्न केला
१२ गाड्या, ६ खासगी वॉटर टँकरसह हॅडोलिक गाड्यांमार्फत सुमारे २ तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यास अग्निशमन दलाला यश आले.
आगीच्या घटनेची माहिती मिळताच सिरम इन्स्टिट्यूटच्या बाहेर प्रचंड गर्दी जमा झाली होती. तसेच पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला होता
सिरम इन्स्टिट्युटमध्ये सध्या कोरोनावरील कोविशिल्ड लसीचे उत्पादन करण्यात येत आहे. ही लस देशभरात तसेच शेजारील राष्ट्रांमध्ये पुरविली जात आहे. त्या ठिकाणी आग लागल्याचे संपूर्ण जगभराचे लक्ष या आगीकडे लागले. केंद्रीय गृहमंत्रालयाने याची दखल घेऊन त्याबाबत चौकशी केली.
मृत्यूच्या दाढेतून परतलेल्या सिरमच्या कामगारांनी सांगितलेला अनुभव अंगावर शहारे आणणारा होता.