Ganesh Visarjan 2018 miravnuk in maharashtra
Ganesh Visarjan 2018 : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2018 04:50 PM2018-09-23T16:50:25+5:302018-09-23T17:02:01+5:30Join usJoin usNext पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आवाहन करत आपल्या लाडक्या बाप्पाला लाखो भक्त आज निरोप देत आहेत. गेल्या १० दिवसांपासून मनोभावे सेवा केल्यानंतर रविवारी (23 सप्टेंबर) सकाळपासून नाचत-गाजत बाप्पाच्या मिरवणुकांना सुरुवात झाली आहे. दरम्यान, डीजेवरील बंदीमुळे यंदा ढोल-ताशा आणि बेंजोच्या तालावर गणेशभक्त थिरकताना दिसत आहेत. पुण्यातील विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली असून मानाच्या पहिल्या कसबा व मानाच्या दुसऱ्या तांबडी जोगेश्वरी गणपतींचे मंडई येथून प्रस्थान झाले आहे. ढोल ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात येत आहे. कोल्हापूरमध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’चा गजर, फुगडीचे फेर धरत, लेझीम खेळत उत्साही वातावरणात लाडक्या गणरायाला निरोप दिला. अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर नाशिककरांनी लाडक्या गणरायाला वाजत गाजत भावपूर्ण निरोप दिला. नाशिकमध्ये काढण्यात आलेली मुख्य विसर्जन मिरवणूक ही केवळ डीजे आणि गुलाल उधळणीला फाटा दिल्यामुळे आदर्श ठरली. 'गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या,' अशा जयघोषाने सोलापूर नगरी दुमदुमली आहे. सकाळपासूनच सोलापूर शहरातील गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीला थाटात प्रारंभ झाला आहे. नंदुरबारमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकांना सकाळपासून सुरुवात झाली आहे. दोनशे पेक्षा अधिक सार्वजनिक तर 500 पेक्षा अधिक खासगी मंडळांतर्फे मिरवणुका सुरू आहेत. खामगाव शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीस रविवारी अकरा वाजता सुरुवात झाली. मिरवणुकीत सर्वात आधी मानाचा गणपती म्हणून ओळखला जाणारा लाकडी गणपतीची पालखी आहे. टॅग्स :गणेश विसर्जनमुंबईपुणेनाशिककोल्हापूरGanesh VisarjanMumbaiPuneNashikkolhapur