Good news... Now get railway tickets on borrowed
खुशखबर...रेल्वेचे तिकिट 'आज उधारी, उद्या रोखीवर' मिळवा By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2019 09:27 AM2019-04-24T09:27:53+5:302019-04-24T09:36:29+5:30Join usJoin usNext भारतात रेल्वेतून प्रवास करणे सर्वच पसंत करतात. कारण प्रवासाचा खर्च आणि दगदग कमी असते. आयआरसीटीसीने आता एक पाऊल पुढे टाकले आहे. रेल्वेची तिकिटे आता उधारीवर काढता येणार आहेत. विश्वास बसत नाहीय ना, हे खरे आहे. रेल्वेने नवीन सुविधा सुरु केली आहे. आयआरसीटीसीने या सेवेचे नाव 'book now and pay later' म्हणजेच ' आता आरक्षित करा, नंतर पैसे द्या' असे ठेवले आहे. तिकिट आरक्षित केल्यानंतर तुम्हाला पैसे द्यायचे आहेत. याचा फायदा असा असेल की तिकिट काढताना सध्या ऑनलाईन पैसे देतेवेळी समस्या आल्याने तिकिटे आरक्षित होत नव्हती त्याला होणार आहे. कसे करणार उधारीवर तिकिट आरक्षण... आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर जाऊन तिकिट बुक करताना पेमेंट पर्यायावर जावे. तेथे गेल्यानंतर पेमेंट कसे करणार त्याचे ऑप्शन येतात. तेथे आता पे लॅटर असा ऑप्शन असेल. त्यावर क्लिक केल्यावर ePayLater वेबसाईटवर रिडायरेक्ट केले जाईल. त्यांच्या खात्यावर लॉगईन केल्यानंतर लगेचच तिकिट आरक्षित होणार आहे. 14 दिवसांच्या आत उधारीचे पैसे द्यावे लागणार उधारीवर तिकिट बूक केल्यानंतर त्याची रक्कम 14 दिवसांत द्यावी लागणार आहे. महत्वाचे म्हणजे यासाठी व्याजही आकारले जाणार आहे. सध्या ePayLater वर ही सुविधा मोफत मिळत आहे. काही काळानंतर यावर व्याज आकारले जाईल. ई पे लॅटरचे अॅपही ई पे लॅटरचे अॅपही आहे. त्यावर आधीच साईन ईन करून ठेवल्यास उपयोगी. नसेल तर रेल्वेच्या लॉगईनवर पे करताना साईन अप करावे लागणार आहे. जसजसे उधारीचे पैसे भराल लिमिट वाढेल सुरुवातीला तुम्हाला उधारीसाठी एक लिमिट असणार आहे. जसजसे तुम्ही उधार तिकिटाचे पैसे वेळेत भरत जाल तसतसे ही क्रेडिट लिमिट वाढत जाईल. टॅग्स :भारतीय रेल्वेआयआरसीटीसीतिकिटIndian RailwayIRCTCticket