असा घडला ऐतिहासिक शेतकरी संप By admin | Published: June 9, 2017 12:00 AM 2017-06-09T00:00:00+5:30 2017-06-09T00:00:00+5:30
अमरावतीत गुरुकुल मोझरीतील आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांच्या गाडीसमोर कांदे आणि दूध फेकून व्यक्त केला निषेध
शेतक-यांनी रस्त्यांवर प्रचंड प्रमाणात भाजीपाला फेकून सरकारविरोधात संताप व्यक्त केला
शेतकरी आंदोलनात रस्त्यावर वाहिले दुधाचे पाट
शेतकऱ्यांच्या संपादरम्यान कोल्हापूर सांगली आणि सातारा या जिल्ह्यातील सात दूध संघातून मुंबईकडे दुधाचे टँकर झेड सेक्युरिटीमध्ये आणण्यात आले होते
नागपूर-मुंबई हायवेवर शेतमालाची वाहनं अडवून मिरच्यांची पोती रस्त्यावर ओतण्यात आली
नाशिकमध्ये डांगसौंदान्यात शेतकऱ्यांनी फडणवीस सरकारची प्रतिकात्मक प्रेत यात्रा काढून सरकारचा निषेध करण्यासाठी सामूहिक मुंडणही केले होते
सोलापुरात पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोहोळजवळ उड्डाण पुलावरून दूध खाली ओतून आंदोलन
यवतमाळमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला शेतकऱ्यांनी घातला दुग्धाभिषेक