बाल दिनानिमित्त 'लोकमत'चा महापत्रकार अभिनव उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2017 08:06 PM2017-11-13T20:06:44+5:302017-11-14T10:48:40+5:30

बालदिनानिमित्त लोकमततर्फे महापत्रकार हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला, उपक्रमाला भावी पत्रकार म्हणून निवडक शालेय विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

या उपक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांना पत्रकार बनण्याची संधी देण्यात आली त्यांनी पत्रकाराची भूमिका लीलया निभावली.

लोकमत बालक दिन विशेष उपक्रमासाठी विशेष मुलाखत देण्यासाठी सर्वात कमी उंचीची तरुणी ज्योती आमगेनं नागपुरातील लोकमत भवनला दिली भेट. संपादकीय विभागात जमलेल्या विद्यार्थ्यांनी घेतली तिची विशेष मुलाखत

औरंगाबादमध्ये विद्यार्थिनी प्रिया मालाणीने घेतली एसीपी सी. डी. शेवगण (वाहतूक विभाग) यांची घेतली मुलाखत

अकोलामध्येही विद्यार्थ्यांनी लोकमत महापत्रकार अभिनव उपक्रम सहभाग नोंदवला

बाल दिनानिमित्त 'डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार'तर्फे 'आई' नावाचा 'देव' या उपक्रमाचे सावित्रीबाई फुले नाट्यमंदिरात आयोजन. ओमकार व विद्यानिकेत शाळेतील विद्यार्थ्यांनी नाट्यगृह हाऊसफुल्ल

प्रख्यात निवेदककार मिलिंद कुलकर्णी यांनी निवेदन केले तर विद्यार्थ्यांकडून कवितांचं सादरीकरण

भावी महापत्रकारांनी नागरी प्रश्नांची सरबत्ती करत नाशिकच्या महापौर रंजना भानसी यांना धरले धारेवर