It should be the memorial of Indu Millar Babasaheb, but when?
असं असेल इंदू मिलवर बाबासाहेबांचं स्मारक, पण कधी? By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2017 07:01 PM2017-12-06T19:01:31+5:302017-12-06T19:05:24+5:30Join usJoin usNext आज 6 डिसेंबर, महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरमधील चैत्यभूमी येथे परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस लाखो अनुयायांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले. इंदू मिल येथे भूमिपूजन होऊन 2 वर्षे झाली तरीही भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे काम सुरु झालेले नाही. 10 ऑक्टोबर 2015 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे भूमीपूजन झाले. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंदू मिल येथे डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन केले होते. या भूमिपूजनाचा २ वर्षाहून अधिक काळ झाला तरीही अजून एक विट रचली गेलेली नाही. बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या आधी आंबेडेकर स्मारकाचे भूमीपूजन केले गेले होते.टॅग्स :डॉ. बाबासाहेब आंबेडकरमुंबईDr. Babasaheb AmbedkarMumbai