कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपोत्सवच्या संपादिका अपर्णा वेलणकर यांनी केले.दिवाळीमध्ये फटाक्यांमुळे होणा-या अपघातामध्ये सगळ्यात जास्त ईजा होतात त्या लहान मुलांना. दरवर्षी आमच्याकडे फटाक्यांमुळे डोळ्यांना ईजा झालेली मुलं येतात. येत्या दिवाळीमध्ये फटाके न वाजवता सगळ्यांनी दीपोत्सवचा सुंदर अंक वाचून दिवाळीचा उत्सव साजरा करावी असे आवाहन नेत्र शल्यविशारद डॉ. तात्याराव लहाने यांनी केले.दीपोत्सवमधील लेखाचा उल्लेख करत प्रसिद्ध चित्रकार सुहास बहुलकर म्हणाले ट्रकच्या मागे लिहिलेल्या कलात्मक चित्रांवर खास लिहिण्यात आलेला दीपोत्सवमधील लेख हा वैशिष्ट्यपूर्ण असून ट्रक आर्टवर बहुदा प्रथमच लिहिलं गेलं असावं.व्हिडीयो कॅसेट विक्रीचं दुकान ते चार राष्टीय पातळीवरील पुरस्कार मिळवणारा दिग्दर्शक असा आनंददायी प्रवास झाला असला तरी मी अजून मध्यमवर्गीय मराठी माणूसच आहे. भूक लागल्यावर वडापावच खावासा वाटतो असे मधुर भांडारकर यांनी नमूद केले.गेली अनेक वर्षे मी केवळ दीवाळी अंक वाचतच नाही तर संग्रही ठेवते. दीपोत्सवमध्ये असलेले लेख अत्यंत समृद्ध असून संग्रही ठेवावा असा हा अंक असल्याचे गौरवोद्गार फैय्याज यांनी काढले.मराठी भाषा ही अत्यंत समृद्ध आहे आणि अत्यंत सुशिक्षित अशा या समाजात दिवाळी अंक लाखाच्या घरात खपू शकतात आणि जिथे जिथे मराठी आहे तिथे तिथे लोकमतचा दीपोत्सव पोहोचू शकतो हे शक्य झालेलं आहे असे लोकमत समूहाचे अध्यक्ष विजय दर्डा यांनी सांगितले.मराठी दिवाळी अंकाच्या शतकोत्तरी इतिहासात वेगळी उंची गाठणा-या लोकमत समूहाच्या "दीपोत्सव" या दिवाळी अंकाचे गुरुवारी १६ ऑक्टोबर रोजी मुंबईत मराठी नाट्यसंमेलनाच्या नियोजित अध्यक्षा फैय्याज यांच्याहस्ते प्रकाशन झाले. लोकमत माध्यम समूहाचे अध्यक्ष व एडिटर इन चीफ खा. विजय दर्डा प्रसिद्ध चित्रकार सुहास बहुलकर दिग्दर्शक मधुर भांडारकर नेत्र शल्यविशारद डॉ. तात्याराव लहाने वृत्तपत्रविक्री क्षेत्रातील व्यावसायिक बुवा दांगट या मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा रंगला.