'खुर्ची'च्या बेधुंद खेळाचा भन्नाट शोध! यंदा 'लोकमत दीपोत्सव'मध्ये खास काय?; पाहा फोटोंमधून...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 01:16 PM2024-10-23T13:16:25+5:302024-10-23T13:45:27+5:30

Lokmat Deepotsav : मराठी वाचकांसाठी दरवर्षी एका नव्या अनुभवाचं दार उघडणारा दिवाळी अंक म्हणजे 'लोकमत दीपोत्सव'!

'रामनाथ गोयंका अवॉर्ड फॉर एक्सलन्स इन जर्नलिझम' या प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवलेला, संपादनापासून मांडणीपर्यंत सतत नवे प्रयोग करणारा आणि मराठी वाचकांसाठी दरवर्षी एका नव्या अनुभवाचं दार उघडणारा दिवाळी अंक म्हणजे 'लोकमत दीपोत्सव'!

गावांच्या, शहरांच्या, विजयांच्या, पराभवांच्या, बदलांच्या आणि बदलत्या माणसांच्या कहाण्या शोधणाऱ्या या दिवाळी अंकानं मराठी साहित्य रसिकांच्या, अभिरुचीसंपन्न वाचकांच्या मनात स्वतःचं स्थान मिळवलं आहे.

२०२४ हे निवडणूक वर्ष असल्यानं या वर्षीचा दीपोत्सव 'खुर्ची'भोवती फिरणारा आहे.

'खुर्ची' - 'सत्ते'पासून 'सेक्स'पर्यंतः 'तिला' बळकावण्याच्या बेधुंद खेळाचा भन्नाट शोध, या थीमवर आधारित यंदाच्या 'दीपोत्सव' आहे.

या 'दीपोत्सव'मध्ये डॉ. अभय बंग, योगेंद्र यादव, महेश झगडे, डॉ. शिरीषा साठे, डॉ. सबीहा, डॉ. भूषण शुक्ल, वंदना अत्रे अशा मान्यवरांचे लेख वाचता येतील.

याचबरोबर, यंदाच्या 'दीपोत्सव'संदर्भात अधिक माहितीसाठी https://deepotsav.lokmat.com/ या वेबसाइटला भेट देऊ शकता.

'दीपोत्सव'च्या या वेबसाईटवर तिथे तुम्हाला दीपोत्सवमध्ये नेमकं काय-काय आहे. याबद्दल संपूर्ण माहिती मिळेल आणि अंकाचं बुकिंगही करता येईल.

दरम्यान, गेल्या वर्षी 'दीपोत्सव' दिवाळी अंकाच्या तीन लाखांहून अधिक प्रती विकल्या गेल्या होत्या. यावर्षीही 'दीपोत्सव'चं बुकिंग सुरू झालं आहे.