EVMमध्ये खरोखरच छेडछाड करता येते? या प्रश्नांच्या उत्तरांमधून दूर होईल संभ्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 12:46 PM2024-12-03T12:46:18+5:302024-12-03T13:09:07+5:30

Maharashtra Assembly Election 2024 Result: नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये विरोधी पक्षांना दारुण पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर विरोधी पक्षात असलेल्या महाविकास आघाडीमधील सर्वच पक्षांच्या नेत्यांनी या परभवाचं खापर इव्हीएमवर फोडलं. खरंतर मागच्या काही वर्षांत पराभूत होणाऱ्या पक्षांकडून पराभवासाठी वारंवार इव्हीएमला दोष दिला गेला आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारमधील वरिष्ठ आयपीएस अधिकारी आणि सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट्स ब्रिजेश सिंह यांनी यासंदर्भातील अनेक प्रश्नांना उत्तरं दिली आहे. यासंदर्भात टाइम्स ऑफ इंडियात प्रसिद्ध झालेल्या वृत्तातील माहिती पुढीलप्रमाणे.

नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये विरोधी पक्षांना दारुण पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर विरोधी पक्षात असलेल्या महाविकास आघाडीमधील सर्वच पक्षांच्या नेत्यांनी या परभवाचं खापर इव्हीएमवर फोडलं. खरंतर मागच्या काही वर्षांत पराभूत होणाऱ्या पक्षांकडून पराभवासाठी वारंवार इव्हीएमला दोष दिला गेला आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारमधील वरिष्ठ आयपीएस अधिकारी आणि सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट्स ब्रिजेश सिंह यांनी यासंदर्भातील अनेक प्रश्नांना उत्तरं दिली आहे. यासंदर्भात टाइम्स ऑफ इंडियात प्रसिद्ध झालेल्या वृत्तातील माहिती पुढीलप्रमाणे.

इव्हीएममधील चिप ही वन टाइम प्रोग्रॅमेबल असते. म्हणजेच तिला एकाच वेळी प्रोग्रॅम कता येते. ही प्रोग्रॅमिंग कठोर निरीक्षणाखाली होते. तसेच स्वतंत्र तज्ज्ञांकडून तिचं कठोर परीक्षण होतं. तसेच निवडणुकीपूर्वी १ हजारंहून अधिक मतांसह मॉक पोल केलं जातं. त्या माध्यमातून मतदान व्यवस्थित होतं की नाही हे पाहिलं जातं. त्यामुळे अशा प्रकारा कुठल्याही एका पक्षाच्या बाजूने प्रोग्रॅम करणं कठीण आहे.

इव्हीएम तयार केल्यानंतर त्यामध्ये कुठलाही सॉफ्टवेअर अपडेट घेतला जात नाही. प्रोग्रॅम ओटीपी चिपमध्ये कायम स्वरूपी साठवला जातो. तो बदलता येत नाही. इव्हीएममध्ये कुठलंही बाहेरील इनपूट पोर्ट होत नाही. तसेच त्याचं मेन्टेनन्स हे पूर्णपणे फिजिकल आणि मेकॅनिकल पद्धतीने होतं.

याचं उत्तर नाही असं आहे. ओटीपी चिपला पुन्हा प्रोगॅम करता येत नाही. तसेच यामधील प्रत्येक मत हे त्यात ज्या प्रमाणे पडतं त्याचप्रमाणे रेकॉर्ड केलं जातं.

डिस्प्ले युनिट केवळ आऊटपूट देण्यासाठी आहे. यामध्ये इनपूट देण्याची क्षमता नसते. ते केवळ माहिती दर्शवण्यासाठी जोडलेले असते. तसेच त्याचा वापर इव्हीएमचा प्रोग्रॅम बदलण्यासाठी करता येत नाही,

जेव्हा प्रेसायडिंग ऑफिसर बॅलेट बटण दाबतो तेव्हाच कंट्रोल युनिट हे मतदानाची परवानगी देते. मतांच्या दरम्यान ५ सेकंटांचा वेटिंग टाइम असतो. त्यामाध्यमातून प्रत्येक मत हे वेगवेगळ्या पद्धतीने रेकॉर्ड होतं. तसेच कुठल्याही प्रकारची चालाखी करून एकच मत दोन वेळा नोंदवता येणार नाही, हे सुनिश्चित होते.

इव्हीएममध्ये काही वैशिष्ट्यपूर्ण फिचर असतात. त्यामुळे काही बिघाड झाल्यास व्हिज्युअल आणि ऑडियो संकेत मिळतात. जर काही बिघाड झाला असेल तर मशीन मतांचा डेटा सुरक्षित करण्यासाठी लॉक होते. त्यानंतर बॅकअप मशिनचा वापर होतो.

इव्हीएममध्ये कुठलाही वायरलेस घटक नसतो. तसेच त्यामध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी, ब्लूटुथ, किंवा बाहेरील पोर्ट्स नसतात. त्यांना एअर गॅप्ड डिझाइन करण्यात आलं आहे. म्हणजेच ते नेटवर्कपासून वेगळे असतात. त्यामध्ये रिमोट हॅकिंगचा कुठलाही धोका नसतो.

इव्हीएमला मिलिट्री ग्रेड प्रमाणांतर्गत इलेक्ट्रोमॅग्नेटिक शिल्डींगसह डिझाइन करण्यात आलेलं आहे. ते बाहेरील चुंबकीय क्षेत्रापासून प्रभावीत होत नाही. त्यामुळे डेटाची इंटीग्रिटी कायम राहते.

इव्हीएमची मेमरी ही AES-256 ने इन्क्रिप्टेड असते. तसेच तिला शारीरिकरीत्या सुरक्षित केलं जातं. मेमरीवर टेम्पर-एव्हिडेंट सिल असतं. जर कुणी त्याच्याशी अॅक्सेस करण्याचा प्रयत्न केला. तर सिल खराब होतं आणि काहीतरी फेरफार झाल्याचं त्वरित लक्षात येतं. त्याबरोबरच मशिनही निरुपयोगी होते.

निकाल सुरुवातीला इव्हीएमवर रेकॉर्ड केले जातात. त्यानंतर ते सुरक्षित चॅनेलच्या माध्यमातून पाठवले जातात. निकालांच्या अनेक प्रती ठेवल्या जातात. त्यामध्ये व्हीव्हीपॅटचाही समावेश असतो. त्यांचा वापर क्रॉस व्हेरिफिकेशनसाठी केला जातो.

इव्हीएमची निर्मिती ही अनेक एजन्सींच्या देखरेखीखाली होते. त्यामध्ये स्वतंत्र सुरक्षा ऑडिटर्सचा समावेश असतो.

इव्हीएम २४ तास सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली, केंद्रीय आणि राज्य एजन्सींच्या सुरक्षेमध्ये असतात. त्यांच्यावर टेम्पर एव्हिडंट सिल लागलेली असते. त्यावर विशिष्ट्य सिरियल नंबर दिलेला असतो.

इव्हीएम ह्या कायम सीसीटीव्हीच्या नजरेखाली ठेवल्या जातात. तीन स्तरीय सुरक्षा आणि डबल लॉक सिस्टिमचा वापर केला जातो. पक्षाचे प्रतिनिधीही आपापले सिल लावतात. तसेच त्या खोलीत प्रवेश करणाऱ्या लोकांचाही रेकॉर्ड ठेवला जातो. तसेच ही सर्व प्रक्रिया अधिकृत कर्मचारी आणि प्रतिनिधींच्या उपस्थितीत केली जाते.

प्रत्येक इव्हीएमचा एक विशिष्ट्य सिरियल नंबर, डिजिटल सिग्नेचर, होलोग्राफिक सील आणि कोड असतो. पक्ष प्रतिनिधींच्या उपस्थितीत तो उघडला जातो.

इव्हीएममध्ये ४८ तासांचा बॅकअप आणि नॉन व्होलाटाइल मेमरी असते. ती कुठल्याही पॉवरशिवायही डेटा सुरक्षित ठेवते. अतिरिक्त पॉवर सिस्टिम बॅटरी खराब झाल्यास डेटा सुरक्षित राहील याची काळजी घेते.

९९ टक्के डिस्प्ले बॅटरी चार्जिंगची टक्केवारी नाही तर व्होल्टेज थ्रेशोल्ड इंडिकेटर आहे. त्यामाध्यमातून बॅटरी व्होल्टेज ऑप्टिमल रेंजमध्ये (७.४व्ही-८.०व्ही) आहे हे दर्शवले जाते. या माध्यमातून योग्य व्होल्टेज स्तर दर्शवला जातो. तसेच इव्हीएममध्ये गैर रिचार्जेबल अल्काइन बॅटरींचा वापर केला जातो.

इव्हीएम ह्या -१० अंश ते +५५ अंश तापमानामध्ये आमि ९५ टक्क्यांपर्यंतच्या उच्च आर्द्रतेमध्ये कार्यरत राहतील, या पद्धतीने डिझाइन करण्यात आल्या आहेत.

व्हीव्हीपॅटच्या माध्यमातून मतदारांना मतदान केल्यानंतर त्यांचं मत कुठल्या उमेदवाराला पडलंय हे छापील पद्धतीने दर्शवतं. त्या माध्यमातून ते आपलं मत योग्य उमेदवाराला मिळालंय याची खात्री करू शकतात. तसेच गरज पडल्यास ऑडिट किंवा पुन्हा मतमोजणी करण्यासाठी त्याचा वापर केला जाऊ शकतो.

व्हीव्हीपॅटमधील मतमोजणीसाठीची निवड प्रक्रिया ही कॉम्प्युटरद्वारे समोर येणाऱ्या रँडम नंबरच्या माध्यमातून केली जाते. त्यामाध्यमातून सर्व पक्षीय उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थिती पारदर्शक पद्धतीने केली जाते.