Maharashtra Ballarshah, Chandrapur stations take top spot in railway beautification contest
चंद्रपूरमधील 'जंगलबुक' ठरलं देशात पहिलं By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2018 08:10 AM2018-05-03T08:10:13+5:302018-05-03T08:10:13+5:30Join usJoin usNext महाराष्ट्रातील बल्लारशाह आणि चंद्रपूर रेल्वे स्टेशनांनी रेल्वे स्टेशन सौंदर्यीकरण स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत बिहारच्या मधुबनी स्थानकाने दुसरा क्रमांक पटकावला. मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळानं या दोन्ही स्टेशनांवर राष्ट्रीय ताडोबा उद्यान आणि स्थानिक आदिवासी कलेतली चित्र रेखाटली आहेत. रेल्वेकडून पारितोषिक जाहीर झाल्यानंतर ही छायाचित्रे सध्या नेटकऱ्यांना भुरळ घालत आहेत. या छायाचित्रांच्या माध्यमातून ताडोबा उद्यानातील समृद्ध वन्यजीवनाची झलक पाहायला मिळते. या स्पर्धैेत तिसरा पुरस्कार संयुक्तरीत्या गुजरातमधील गांधीधाम, राजस्थानमधल्या कोटा आणि तेलंगणातल्या सिकंदराबाद स्टेशनांना मिळाला आहे. पहिल्या स्थान पटकावलेल्या विजेत्या स्टेशनला 10 लाख रुपये देण्यात येणार आहेत. दुसऱ्या स्थानी असलेल्या स्थानकांना 5 लाख रुपये मिळणार आहेत. तिसऱ्या स्थानी असलेल्या विजेत्या स्टेशनांना पुरस्काराच्या स्वरूपात 3 लाखांचं बक्षीस मिळणार आहे. चंद्रपूर रेल्वे स्थानकावरचे जिने, भिंती सर्वच ठिकाणी वन्यजीवांच्या छबी चितारण्यात आल्या आहेत.टॅग्स :महाराष्ट्रसोशल व्हायरलMaharashtraSocial Viral