Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरेंच्या इमोशनल कार्डनं जागवल्या बाळासाहेबांच्या आठवणी! 1992 मध्ये 'हिंदू हृदय सम्राट' बोलेले होते हा 'डायलॉग' By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 02:42 PM 2022-06-23T14:42:14+5:30 2022-06-23T14:59:24+5:30
Maharashtra Political Crisis: मातब्बर नेते एकनाथ शिंदे यांच्या "महाबंडामुळे", मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपुढे आता शिवसेना वाचविण्याचे "महाआव्हान" उभे ठाकले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या आपल्या आयुष्यातील अत्यंत वाईट स्थितीतून जाताना दिसत आहेत. मातब्बर नेते एकनाथ शिंदे यांच्या "महाबंडामुळे", शिवसेना वाचविण्याचे आव्हान आता त्यांच्या पुढे उभे ठाकले आहे. आपल्याकडे एकूण 46 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा खुद्द एकनाथ शिंदे यांनी केला आहे. अशा स्थितीत महाविकास आघाडी सरकार कोसळणे जवळपास निश्चित मानले जात आहे.
शिवसेनेला यापूर्वीही करावा लागला आहे संकटांचा सामना - शिवसेनेवर आलेले हे संकट काही नवे नाही. यापूर्वीही शिवसेनेने असे संकट आले आहे. गेल्या 30 वर्षांपूर्वी, म्हणजेच 1992 मध्येही शिवसेनेच्या अस्तित्वावरच संकट आले होते. तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी सेनेला या संकटातून बाहेर काढले होते.
सध्य स्थितीत उद्धव ठाकरे यांची कृतीही साधारणपणे तेव्हाच्या बाळासाहेबांच्या कृती प्रमाणेच दिसत आहे. राज्यात मोठा राजकीय भूकंप झाल्यानंतर, ते बुधवारी पहिल्यांदाच सर्वांसमोर आले आणि त्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमाने जनतेला संबोधित केले. आपल्यासाठी पक्ष प्रथम असून मुख्यमंत्रीपदात आपल्याला काहीही रस नाही, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. एवढेच नाही, तर आपण शिवसेना पक्षप्रमुख पद सोडण्यासही तयार आहोत, असेही ते म्हणाले.
उद्धव ठाकरेंच्या इमोशनल कार्डनं जागवल्या बाळासाहेबांच्या आठवणी - उद्धव ठाकरे यांनी आपल्या या संवादातून बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणी ताज्या केल्या, खरे तर, 1992 मध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे सहकारी माधव देशपांडे यांनी अनेक अरोप केले होते. त्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पक्षातील हस्तक्षेपाचा मुद्दा बनवला होता. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून एक लेख लिहिला होता.
या लेखात बाळासाहेब म्हणाले होते, "जर कुण्याही शिवसैनिकाने आपल्यासमोर येऊन असे सांगितले, की त्याने ठाकरे कुटुंबामुळे पक्ष सोडला, तर आपण त्या क्षणी शिवसेना प्रमुख पदाचा राजीनामा देऊ. एवढेच नाही, तर आपले संपूर्ण कुटुंब शिवसेनेपासून दूर होईल.
बाळासाहेबांचा हा लेख वाचून शिवसेनेचे लाखो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. तर, काही कार्यकर्त्यांनी आत्महत्येची धमकीही दिली होती. मातोश्री बाहेर हजारो लोक जमले होते. यानंतर, शिवसेना नेतृत्वाने बाळासाहेब ठाकरे यांना समजावले होते.
यानंतर, माधव देशपांडे यांनी केलेले सर्व आरोप बाजूला सारले गेले, प्रकरणही संपले. यानंतर, कुणीही बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर कधीही कशाही प्रकारचे प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाही.
आता एकनाथ शिंदे यांनी, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सरकार स्थापन केरण्याचा उद्धव ठाकरे यांचा निर्णय चुकीचा होता, असे म्हटले आहे. एवढेच नाही, तर यामुळे शिवसेनेची हिंदुत्वाची छबी खराब झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी आपला पक्ष संकटातून बाहेरही काढला होता आणि वाचवलाही होता. मात्र आता, त्याच पद्धतीने उद्धव ठाकरे शिवसेना वाचवू शकतील का, हे बघावे लागेल. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे....