Maharashtra Vidhan Sabha 2024: 1962 ते 2019... प्रत्येक निवडणुकीत अपक्षांनी किती मते खाल्ली?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2024 01:54 PM2024-11-20T13:54:43+5:302024-11-20T14:01:14+5:30

Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीत यावेळी अपक्ष उमदेवार महत्त्वाचे ठरणार असल्याची चर्चा आहे. अपक्ष निवडून येणाऱ्या उमेदवारांची संख्या मोठी असेल, असा अंदाज राजकीय विश्लेषक मांडत आहेत.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये अपक्षांनी प्रत्येक निवडणुकीत किमान ८ ते २४ टक्क्यांपर्यंत मते ओढण्यात यश मिळविले आहे.

१९९५ मध्ये भाजपला ३२.१६ %, काँग्रेसला ३१.२३% तर शिवसेनेला २७.७% मते मिळाली होती.

त्याखालोखाल अपक्षांना २३.६३% मते मिळाली होती. प्रत्येक निवडणुकीत अपक्षांच्या मतांमुळे प्रमुख राजकीय पक्षांच्या मतांवर मोठा परिणाम होत असल्याचे आकडेवारीतून दिसते.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या आतापर्यंतच्या इतिहासात अपक्ष उमेदवारांना सर्वाधिक मते १९९५ मध्ये मिळाली होीत. २३.६३ टक्के मते अपक्षांना मिळाली होती.

त्यापूर्वी १९८५ च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारांना लक्षणीय मते मिळाली होती. या निवडणुकीत १७.४९ टक्के मते अपक्षांना मिळाली होती.

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अपक्ष उमेदवारांच्या झोळीत सर्वात कमी मते २०१४ मधील विधानसभा निवडणुकीत पडली होती. या निवडणुकीत चारही पक्ष वेगवेगळे लढले होते. ४.७१ टक्के मते अपक्षांना मिळाली होती.

१९६२ मध्ये झालेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारांना मिळालेल्या मतेही लक्षणीय होती. १६.७४ टक्के मते अपक्ष उमेदवारांना मिळाली होती.