Master Blaster participated in 'Cleanliness Service' campaign
मास्टर ब्लास्टरने घेतला ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानात सहभाग By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2017 02:29 PM2017-09-26T14:29:33+5:302017-09-26T14:32:24+5:30Join usJoin usNext पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानात आज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सहभाग घेतला. सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकर तसंच युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरेंनीही या अभियानात सहभाग घेतला. आज पहाटे पाच वाजता हाती झाडू घेऊन सचिन तेंडुलकर, अर्जुन तेंडुलकर आणि आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील वांद्रे बॅण्डस्टॅण्ड परिसरात साफसफाई केली. प्रत्येक नागरिकाने आपला देश हे आपलं घर समजून स्वच्छ करावं, असं आवाहन सचिन तेंडुलकरने यावेळी केलं. लोकांनी कुठेही कचरा फेकू नये. आपलं शहर, आपली भूमी आपणच स्वच्छ ठेवायला हवी, असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी केलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून आदित्य ठाकरे आणि सचिन तेंडुलकर यांचं ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानात सहभाग घेतल्याबद्दल कौतुक केलं. टॅग्स :सचिन तेंडूलकरआदित्य ठाकरेSachin TendulkarAditya Thackrey