महाराष्ट्राचे 'दाजी', चुलीवर बनवताहेत भाकरी अन् भाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 02:08 PM2020-04-21T14:08:09+5:302020-04-21T14:28:19+5:30

केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री रावसाहेब दानवे यांची सोशल मीडियावर वेगळीच क्रेझ आहे, सध्या लॉकडाऊन कालावधीत त्यांनी चक्क रेशन दुकानावर धडक मारली

लॉकडाऊन असल्याने सध्या घरीच बसून दानवे यांना मंत्रालयाच्या कामाचा आढावा घ्यावा लागत आहे, त्यामुळे ते घरी बसून स्वत: लॅपटॉपच्या सहाय्याने आपलं कामकाज करत आहेत

ज्या प्रमाणे मी घरात आहे, तसंच नागरिकांनीही घरातच रहावे, असे आवाहन दानवे पाटील यांनी महाराष्ट्रातील जनेतला केलं आहे. विशेष म्हणजे आपला मराठवाड्यातील गमछा तोंडाला बांधून त्यांनी त्याला मास्क बनवलाय

लॉकडाऊन काळात गरिबांना व गरजूंना अन्न आणि फळे अशी मदत पाटील यांनी केली.

कोरोनापासून बचाव करण्यासाठी अत्यावश्यक सेवेत कार्य करणाऱ्यां कर्मचाऱ्यांना रावसाहेबांनी मास्क वाटप केलं, तोंडाला मास्क लावूनच घरातून बाहेर पडण्याचं त्यांनी सांगितलंर

रावसाहेब दानवे पाटील यांचे फोटो म्हणजे सोशल मीडियावर सेन्सेशन असते, चाहत्यांना ते फोटो खूप आवडतात म्हणूनच ते मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात.

यापूर्वी रंगपंचमी दिवशी बगिचामध्ये व्यायाम करताना रावसाहेब दानवे पाटील यांचा फोटो व्हायरल झाला होता, आता चक्क स्वयंपाकात मदत करताना ते दिसत आहेत.

रावसाहेब दानवे पाटील यांना नेटीझन्स लाडाने आणि हक्काने दाजी म्हणतात, महाराष्ट्राचे ते लाडके दाजी बनले आहेत.

लॉकडाऊन काळात आपल्या पत्नीसोबत त्यांनी स्वयंपाक केला. यावेळी, चुलीवर भाकरी अन् भाजी बनविण्याचा आनंद त्यांनी घेतला.