मिशीतले राज, विशीतले राज... मनसेप्रमुखांचा वेगळाच बाज!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2020 21:16 IST2020-04-22T20:51:57+5:302020-04-22T21:16:53+5:30

लॉकडाऊनच्या काळात मोबाईल आणि सोशल मीडियाभोवतीच आपलं आयुष्य फिरतंय. सगळ्यांनाच भरपूर वेळ असल्यानं फेसबुकवर वेगवेगळी चॅलेंज जोरात सुरू आहेत. सध्या, आपले विशीतले फोटो पोस्ट करण्याचा ट्रेंड भलताच हिट झालाय.
मनसेच्या शिलेदारांनी, राज ठाकरे समर्थकांना हा विशीतल्या फोटोंचा ट्रेंड ‘मनसे’ आवडला. त्यांनी ‘विशीतले राजसाहेब’ या हॅशटॅगसह आपल्या ‘राजसाहेबांचे’ विशीतले फोटो (2000 सालापूर्वीचे) सोशल मीडियावर पोस्ट केले.
मनसेचे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांना ही कल्पना सुचली आणि मनसैनिकांनी त्याला झक्कास प्रतिसाद दिला.
राज ठाकरेंची पर्सनॅलिटी, त्यांची हटके स्टाईल, त्यांचा रुबाब, त्यांचे छंद या सगळ्याची झलक या फोटोंमधून दिसते.
तरुणांमध्ये राज ठाकरेंची इतकी क्रेझ का, या प्रश्नाचं उत्तरही काही फोटो देतात.
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत त्यांचं नातं किती घट्ट, विश्वासाचं होतं, याचंही दर्शन काही फोटोंमधून घडतं.
शिवसेनेत सक्रिय झालेले राज ठाकरेही काही फोटोंमध्ये दिसतात.
भाऊ आणि मित्रपरिवारासोबतचं राज ठाकरेंचं 'बाँडिंग'... आज पक्ष वेगळे असले तरी 'भावबंध' अजून टिकून असल्याचं अनेक प्रसंगांमधून दिसलं आहे.
‘लॉकडाऊन’च्या काळात हे फोटो ‘डाऊन द मेमरी लेन’ घेऊन जातात.