#NationalGirlChildDay: Look at the marathi girl who runs her father's political legacy
#NationalGirlChildDay : बघा वडिलांचा राजकीय वारसा चालवणाऱ्या मराठमोळ्या कन्या By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2020 06:13 PM2020-01-24T18:13:57+5:302020-01-24T18:21:01+5:30Join usJoin usNext यात पहिले नाव राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि कन्या सुप्रिया सुळे यांचे आहे. सुप्रिया यांचे वाढते राजकीय वजन लक्षात घेता त्यांना पवार यांच्या वारसदार मानले जात आहे. भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर कन्या पंकजा त्यांचा वारसा समर्थपणे चालवत आहेत. त्यांच्या दुसऱ्या कन्या खासदार प्रीतम मुंडे याही दुसऱ्यांदा निवडून आल्या आहेत. देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे तिसऱ्यांदा सोलापूरमधून निवडून आल्या आहेत. त्यांच्यामध्ये कार्यकर्ते शिंदे यांचीच छबी आढळून येत असल्याचे सांगतात पूनम महाजन या भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या असून त्यांचे वक्तृत्वही वडिलांसारखे ओजस्वी असल्याचे बोलले जाते. वर्षा गायकवाड या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील सदस्या असून त्या काँग्रेस नेते एकनाथ गायकवाड यांच्या कन्या आहेत. टॅग्स :सुप्रिया सुळेपूनम महाजनप्रणिती शिंदेवर्षा गायकवाडपंकजा मुंडेSupriya SulePoonam MahajanPraniti ShindeVarsha GaikwadPankaja Munde