नारीशक्तीचा प्रभाव...मोटारसायकल चालवण्यापासून ते ढोल पथकांपर्यंत महिला उत्साहाने पुढे होत्या. गिरगावमधील शोभायात्रेत ढोल वाजवण्यात रमलेली ही तरुणी.शोभा यात्रेतून सामाजिक संदेश देण्याची परंपरा यंदाही कायम होती. डोंबिवलीतील स्वागत यात्रेत वॉट्स अॅप व फेसबुकच्या दुष्परिणामाकडे लक्ष वेधणारी चिमुकली.गुढीपाडव्याचे आकर्षण ठरणा-या डोंबिवलीतील शोभा यात्रेत आबालवृद्ध पारंपारिक वेशात नटूनथटून सहभागी झाले होते.अलिबागमधील शोभा यात्रेत चित्तथरारक कसरती सादर करताना तरुण.शूर आम्ही सरदार... नवी मुंबईतील शोभायात्रेत शिवाजी महाराजांवरील आधारित चित्ररथ. शिवाजी महाराज व त्यांच्या मावळ्यांच्या वेशभूषेतील ही लहान मुलं सर्वांच लक्ष वेधून घेत होतीआता मिशन कल्याण डोंबिवली...मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण व डोंबिवलीमधील स्वागत यात्रेला हजेरी लावली. कल्याण - डोंबिवलीत आगामी काळात महापालिका निवडणूक होणार असून या महापालिकेवर भाजपाचा झेंडा फडकणवार असा निर्धार फडणवीस यांनी केला असावा.स्वागत यात्रेची मुहूर्तमेढ रोवणा-या डोंबिवलीत शोभा यात्रेत महिलांचे झांज पथक.प्रजासत्ताक दिनी राजपथावर अव्वल ठरलेले पंढरीची वारी हे चित्ररथ गिरगावमधील शोभा यात्रेच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले होते.जुहू चौपाटीवर १०० फूट उंच गुढी उभारण्यात आली होती. ही गुढी यंदाचे वैशिष्ट्य ठरली होती.गुढी पाडवा जल्लोषात साजरा व्हावा यासाठी बंदोबस्तावर असलेल्या या महिला पोलिसांनी स्वागत यात्रेची छबी मोबाईलमधील कॅमे-यात टिपली.मुंबईतील गिरगाव येथील स्वागत यात्रेत मराठमोळ्या वेशातील या तरुणींनी दुचाकीवर चित्तथरारक कसरत करुन हम भी किसी से कम नही असा संदेश दिला.पारंपारिक वेषात यात्रेत मोटारसायकलवरुन शोभा यात्रेत सहभागी झालेल्या या महिला. स्त्री शक्तीचे आधुनिक रुप या यात्रेत बघायला मिळाले.गुढी पाडव्याला मराठी नववर्षाच्या स्वागतानिमित्त राज्याच्या विविध भागांमध्ये स्वागत यात्रांचे आयोजन करण्यात आले होते. अभिनेता अभिषेक बच्चन व त्याची पत्नी ऐश्वर्या राय - बच्चन यांनी मुंबईतील स्वागत यात्रेत सहभागी होत उपस्थितांचा उत्साह वाढवला. राज्यातील शोभा यात्रांचा टाकलेली एक नजर