यंदा 'रमजान' महिन्यात 'नो मस्जीद नमाज, No इफ्तार' By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 06:37 PM 2020-04-20T18:37:01+5:30 2020-04-20T19:16:19+5:30
Post Saudi Arabia’s announcement of ‘no taraweeh’ this Ramadan due to Covid19 pandemic, Pune Daily asked the ministry of minority affairs of Maharashtra about the same; whether the same decision will be implied here in the state. पुढील काही दिवसांत पवित्र रमजान महिन्याला सुरुवात होत आहे, त्यासाठी मुस्लीम बांधवांनी लॉकडाऊनचे नियम पाळणे बंधनकारक आहे.
देशात व राज्यात वाढलेला कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता, मुस्लीम बांधवांना रमजान महिन्यातही काटेकोरपणे सरकारी नियमांचे पालन करावेच लागले.
रमजान महिना हा मुस्लीम बांधवांसाठी पवित्र असतो, यावेळी नमाज पठण करण्यासाठी मुस्लीम दरवर्षी एकत्र येतात. मात्र, यंदा लॉकडाऊनमुळे ते शक्य नाही.
राज्यातील अनेक ठिकाणी मशिदीमध्ये मुस्लीम एकत्र येऊ नमाज पठण करत असल्याचे दिसून आले, त्यावर पोलिसांनी कारवाईही केली आहे.
या सर्व प्रकरणाची दखल घेत, अल्पसंख्याक विकास विभागाने रमजान महिन्यासाठी आवाहन केलं आहे. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ट्विटरवरुन याबाबत माहिती दिली.
कोणत्याही परिस्थितीत घराच्या छतावर, मैदानावर, इमारतीच्या छतावर एकत्र येऊन नमाज पठण करु नये
कोणताही धार्मिक, सामाजिक, कौटुंबिक कार्यक्रम एकत्रित येऊन करण्यास मज्जाव करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी
सर्व मुस्लीम बांधवांनी घरातच नमाज पठण करावे, तरावीह इफ्तार पार्टी आणि धार्मिक कार्य पार पाडावे
लॉकडाऊन संदर्भात पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत, उपरोक्त सूचनांचे पालन करावे.