CoronaVirus News: राज्यात आज एकही ओमायक्रोनबाधित रुग्णाची नोंद नाही; ५४४ नव्या कोरोना रुग्णांची भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2021 21:38 IST2021-12-20T21:25:30+5:302021-12-20T21:38:40+5:30

गेल्या २४ तासांत राज्यात ५४४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ४ जणांचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

दिवसभरात ५१५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे सध्या राज्यात ७०९३ रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती, आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यात आज ओमायक्रॉनचा एकाही ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली नाही. आतापर्यंत ५४ ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी ३१ रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.

राज्याचा मृत्यूदर २.१२ टक्के झाला आहे. सध्या राज्यात ८१ हजार ६६१ व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत. तर ८७७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,७७,७१,६७६ प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.

दरम्यान, देशभरात कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण ३ कोटी ४७ लाख ४६ हजार ८३८ जणांना लागण झाली आहे. त्यापैकी ४ लाख ७७ हजार ५५४ लोकांचा मृत्यू झाला आहे. चांगली बाब म्हणजे, आतापर्यंत ३ कोटी ४१ लाख ८७ हजार लोक बरे झाले आहेत.