Bio Diversity day : पृथ्वीवर केवळ माणसांचा नव्हे तर सगळ्यांचा हक्क !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 16:10 IST2018-05-22T16:10:48+5:302018-05-22T16:10:48+5:30

जैवविविधतेने नटलेली पृथ्वी. पृथ्वी म्हटली की झाडे, झुडुपे, वेली, फुले, किटक, पक्षी, प्राणी अशी एक मोठी परिसंस्था तेथे आढळते. मात्र या पृथ्वीवर सगळ्यात बुध्दीमान अशा मनुष्यप्राण्याने आपला हक्क सांगण्यास सुरूवात केली आणि मग अन्य जीवांची घुसमट सुरू झाली.
जैवविविधता संकटात सापडली. जंगलांचे अस्तित्व धोक्यात आले, परिणामी ज्यांचा हक्काचा अधिवास जंगल होते अशा जीवांची भटकंती सुरू झाली आणि मग माणसानेच त्यांच्याविषयीची ओरड करण्यास प्रारंभ केला
तर बघूया या छायाचित्र मालिके तून पृथ्वीवरील माणसांव्यतीरिक्त अन्य जीवांचा आनंद अन् सौंदर्य खास जैवविविधता दिनानिमित्त...
सर्व छायाचित्रे प्रशांत खरोटे