The number of corona patients in the state is 37,136, 2127 positive in one day MMG
राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 3७,१३६, एका दिवसात २१२७ पॉझिटीव्ह By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 10:47 PM2020-05-19T22:47:10+5:302020-05-19T22:59:17+5:30Join usJoin usNext राज्यात आज 2127 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 37136 अशी झाली आहे. मुंबईतील एकूण रुग्णांची संख्या २२५६३ पर्यंत पोहोचली असून आज दिवसभरात मुंबईत १४११ नवीन पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. मंगळवार १९ मे रोजी नवीन 1202 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 9639 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 26164 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. सोमवारी 2033 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या 35058 अशी झाली होती. सध्या राज्यात दिवसाला सुमारे १५ हजार चाचण्या, त्यासाठी ६७ प्रयोगशाळा कार्यान्वित. राज्याचा मृत्यूदर हा ३.२ टक्के, रुग्ण बरे होण्याचा दर २५ टक्के आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय. राज्यात आज #COVID_19 चे १२०२ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची ही सर्वाधिक संख्या. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर सुमारे २५ टक्के एवढा झाला आहे. कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १४ दिवसांवर नेण्यात आल्याचेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितलंय. राज्यात कोरोनाच्या प्रतिकारासाठी साधनांची अजिबात कमतरता नाही. मुंबईत सध्या खाटांची कमतरता. मात्र, ही परिस्थिती कायम राहणार नाही. गेल्या काही दिवसांपासून बीकेसी, वरळी डोम, गोरेगाव येथे कोरोना केअर सेंटर उभारणी सुरु असल्याचेही टोपे म्हणाले. आरोग्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्हद्वारे आज राज्यातील जनतेशी संवाद साधला. त्यावेळी, कोरोनोसंदर्भातील राज्याच्या परिस्थितीवर त्यांनी भाष्य केलंय. टॅग्स :राजेश टोपेमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबईRajesh TopeCoronavirus in MaharashtraMumbai