One click on 'Chief Minister' Uddhav Thackeray's oath-taking ceremony
'मुख्यमंत्री' उद्धव ठाकरेंचा जंगी शपथविधी सोहळा एका क्लिकवर By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 09:06 PM2019-11-28T21:06:47+5:302019-11-28T21:28:45+5:30Join usJoin usNext काँग्रेस नेते आणि प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली, त्यावेळी सोनिया गांधींचं नाव घेऊन त्यांनी आपल्या शपथविधी सोहळ्याला सुरुवात केली छगन भुजबळ यांच्या रूपाने 5 वर्षानंतर पुन्हा भुजबळ यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा कार्यभारदेखील त्यांनाच दिला जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांची शपथ लक्षवेधी ठरली. शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांना वंदन केले, तसेच आपले गुरु आनंद दिघे यांचे त्यांनी आवर्जुन स्मरण केले. काँग्रेस नेते नितीन राऊत यांना काँग्रेसकडून पहिल्याच यादीत मंत्रीपद देण्यात आलंय, त्यामुळे विदर्भाला बहुमान मिळालाय राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी आपल्या आईचे नाव घेत आणि शरद पवारांना नमन करत शपथविधीला सुरुवात केली ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांनीही पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. महाराष्ट्राच्या विधानसभेवर भगवा फडकवण्याचं शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न आज त्यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांनी पूर्ण करून दाखवलंच. ज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्याआधी त्यांनी शिवाजी पार्कातीलच बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर जाऊन आपल्या वडिलांना वंदन केलं. राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची धुराही उद्धव यांनी स्वतःच्या खांद्यावर घेत शिवसेनेच्या सोनेरी इतिहासात नवा अध्याय रचला आहे. उद्धव ठाकरेंच्या या शपथविधी सोहळ्याला मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांची गर्दी होती, देशभरातून दिग्गजांनी आणि राजकीय नेत्यांनी याची देही याची डोळा हा सोहळा पाहिला ज्या शिवाजी पार्क मैदानात बाळासाहेबांनी शिवसेनेचं रोप रुजवलं आणि वाढवलं, त्याच शिवाजी पार्क मैदानावर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्याचे २९ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. 'छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आणि माझ्या आई-वडिलांचे स्मरण करून मी उद्धव बाळासाहेब ठाकरे ईश्वरसाक्ष शपथ घेतो की, कायद्याद्वारे स्थापित झाले आहे, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी शपथ घेतली. शपथविधी सोहळा पूर्ण झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी शिवाजी पार्कसमोरील शिवसैनिक आणि महाराष्ट्रातील जनतेसमोर नतमस्तक होऊन आभार मानले शपथविधी सोहळ्यानंतर उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब सिद्धीविनायक मंदिरात जाऊन देवा श्रीगणेशाचे दर्शन घेतले.टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनामुख्यमंत्रीमुंबईजयंत पाटीलUddhav ThackerayShiv SenaChief MinisterMumbaiJayant Patil