... तरच मिळते नुकसानभरपाई; जाणून घ्या पीक वीम्याची प्रक्रिया असते कशी? By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 05:28 PM 2023-03-20T17:28:00+5:30 2023-03-20T17:48:02+5:30
राज्यात अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून सर्वच ठिकाणी शासनाकडून पंचनामे करण्यात येणार आहे. मात्र, पंचनाम्याची ही प्रक्रिया असते कशी हे या लेखातून जाणून घेऊया. राज्यात अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून सर्वच ठिकाणी शासनाकडून पंचनामे करण्यात येणार आहे. मात्र, पंचनाम्याची ही प्रक्रिया असते कशी हे या लेखातून जाणून घेऊया.
नुकसानीची तीव्रता पाहून सरकारकडून कृषी विभाग आणि महसूल विभागाला पीक पाहणी करुन पंचनामे करण्याचे आदेश दिले जातात.
पेरणीनंतर नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास मदतीसाठी आवश्यक असते पीक विमा योजनेमध्ये सहभाग नोंदवणे, पिकनिहाय विमा कंपनीकडून मदतीची रक्कम ही ठरवून दिली जाते.
नैसर्गीक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास सर्वप्रथम गावचा कृषी सहाय्यक, तलाठी आणि ग्रामसेवकास याची माहिती देणे गरजेचे असते. त्यानंतर संबंधित दोन्ही विभागाचे अधिकारी बांधावर येऊन पिकांची पाहणी करतात.
नुकसानग्रस्त भागाची पाहणी होत असताना शेतकऱ्यांजवळ सातबारा उतारा, आधार कार्ड, विमा भरलेली पावती आणि क्रमांक, रेशनकार्डची झेरॉक्स, बॅंक पासबुकची झेरॉक्स, असणे गरजेचे आहे.
पेरणी क्षेत्रापैकी किती क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे, त्याची तीव्रता काय आहे? या संबंधिचा अहवाल हा कृषी कार्यालय आणि महसूल विभागाला दिला जातो.
महसूल विभागाकडून नुकसानीचा अहवाल हा विमा कंपनीकडे पाठवला जातो. शासकीय अधिकारी आणि विमा कंपनीचे प्रतिनीधी हे मदतीची रुपरेषा ठरवतात.
पेरणी क्षेत्रापैकी २५ टक्के पेक्षा अधिकच्या क्षेत्रावरील नुकसान झाले असल्यासच ही भरपाई मिळते.
नुकसानीच्या अहवालाची पाहणी केल्यानंतरच शेतकऱ्यांनी दिलेल्या बॅंक पासबूकच्या खात्यावर भरपाईची रक्कम जमा केली जाते.