पालघर : तारापूर एमआयडीसीमध्ये अग्नितांडव, तिघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2018 13:37 IST2018-03-09T13:37:55+5:302018-03-09T13:37:55+5:30

तारापूरजवळ एमआयडीसीमध्ये नोव्हाफिन रसायन कंपनीत बॉयलरचा स्फोट झाल्याने लागलेल्या भीषण आगीत 3 जणांचा होरपळून मृत्यू झाला तर 12 जण जखमी झाले आहेत.

मृत पावलेल्या तीन जणांपैकी एक जण सुरक्षा रक्षक असल्याची माहिती समोर आली आहे.

स्फोटाच्या हाद-यामुळे तब्बल 15 किमीचा परिसरात बसल्याचीही माहिती समोर येते आहे.

सुमारे एक ते दीड तास स्फोटाचे आवाज ऐकू येत होते, अशी माहिती स्थानिकांनी दिली.

स्फोटामध्ये एकूण सहा कंपन्या आगीच्या विळख्यात सापडल्या.

पालघर शहरासह जिल्ह्यातील उमरोळी, सातपाटी, केळवा व चिंचणी अनेक गावांमध्येही हादरे जाणवले.

टॅग्स :आगfire