पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं पुरातन रूप समोर, असा आहे विठुमाऊलीचा ७०० वर्षांपूर्वीचा गाभारा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 10:45 PM2024-05-30T22:45:11+5:302024-05-30T22:48:53+5:30

Pandharpur Vitthal Rukmini Temple: मंदिराच्या संवर्धनाच्या कामादरम्यान मंदिराच्या अंतर्भागात नव्याने करण्यात आलेलं बांधकाम हटवण्यात आल्याने मंदिराचं जुनं सुंदर स्वरूप समोर आलं आहे.

महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये सध्या संवर्धनाचं काम सुरू आहे.

मंदिराच्या संवर्धनाच्या कामादरम्यान मंदिराच्या अंतर्भागात नव्याने करण्यात आलेलं बांधकाम हटवण्यात आल्याने मंदिराचं जुनं सुंदर स्वरूप समोर आलं आहे.

सुमारे ७०० वर्षांपूर्वीचं मंदिराचं दगडी बांधकाम, त्यावरील आखीवरेखीव कलाकुसर पाहून भक्तांचं मन तृप्त होत आहे.

दरम्यान, मंदिराच्या संवर्धनाच्या कामामुळे १५ मार्च पासून विठूमाऊलींचं चरण स्पर्श दर्शन बंद होतं. या काळात मर्यादित कालावधीसाठी माऊलींचं मुखदर्शन सुरू होतं.

संवर्धनाच्या कामानंतर आता विठू माऊलींसोबतच मंदिरातील गाभारा आणि मुख्य गाभारा याचं दर्शनही भाविकांना होणार आहे.

आता २ जूनपासून भाविकांना विठूमाऊलीचं चरणपददर्शन घेता येणार आहे. मात्र मंदिराच्या सुशोभिकरणाचं काम पूर्ण होण्यास अजून काही कालावधी लागणार आहे.