Photo's 'Chhatrapati Takht Marathi, Blood of Marathi Marathi' marathi bhasha din MMG
Photo's : 'छत्रपतींचे तख्त मराठी, मराठ्यांचे रक्त मराठी' By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2020 03:09 PM2020-02-27T15:09:41+5:302020-02-27T15:21:22+5:30Join usJoin usNext विधानभवनातील मराठी भाषा दिन कार्यक्रमात मराठी ग्रंथ दिंडी काढण्यात आली. तसेच विधान भवनाच्या आवारात स्टॉल लावण्यात आले होते. ज्या संस्कारातून स्वराज्य उभारलं तीच भाषा मराठी आहे, छत्रपती शिवरायांवर संस्कार घडविणाऱ्या जिजाऊंची भाषा मराठी आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटले मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने टाळ, मृदुंग, वीणा आणि पारंपरिक वेशभुषेत मराठी ग्रंथ दिंडीने यात्रा केली वारकरी संप्रदायाची भूमी असलेल्या मराठी संत ज्ञानेश्वरांपासून ते संत गाडगे बाबांपर्यंत सर्वांनीच मराठीच प्रचार आणि प्रसार केलाय. त्याच वारकरी वेशाष विधानभवनात मराठीजण दिसून आले. चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांनी मराठी भाषा दिनी संस्कृत भाषा लिहिलेली डिझाईन असलेली साडी परिधान केली होती, विधानभवन परिसरात ही साडी लक्षणीय आणि चर्चेची ठरली. विधानभवन परिसरात महाराष्ट्रमधील ग्रामीण जीवन दाखवण्यात आले. लोहार, न्हावी कुंभार इत्यादी कसे काम करतात हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कुतूहलाने पाहिले. राज्यातील सर्वच शाळांमध्ये मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी, विद्यार्थ्यांमध्येही मराठी भाषेचा गोडवा दिसून आला. विधानभवनात 'मराठी भाषा दिन' कार्यक्रमात मराठी भाषेची परंपर, संस्कृती, वारसा आणि जतन यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं. गोंधळी, वारकरी आणि मराठी लोककलेचाही सहभाग विधानभवनातील ग्रंथदिंडी आणि कार्यक्रमात दिसून आला.टॅग्स :मराठी भाषा दिनउद्धव ठाकरेमराठीMarathi Bhasha DinUddhav Thackeraymarathi