सुपर बाईक अन् ‘सुपर स्पेशल’ व्यक्ती; सरन्यायाधीश शरद बोबडेंना दिसली Harley Davidson, अन्... By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 02:52 PM 2020-06-29T14:52:47+5:30 2020-06-29T15:02:09+5:30
सरन्यायाधीश शरद बोबडे यांना Harley Davidson सुपर बाईकची मोहिनी... देशाचे ४७ वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांनी गेल्या वर्षी १८ नोव्हेंबर रोजी शपथ घेतली. त्यांच्या रूपाने मराठमोळा माणूस देशातील न्यायव्यवस्थेच्या 'सर्वोच्च' स्थानी विराजमान झाला आहे.
न्या. शरद बोबडे हे मूळचे नागपूरचे आहेत आणि लॉकडाऊनच्या काळात ते आपल्या घरीच आहेत.
आपल्या घरूनच ते सर्वोच्च न्यायालयाच्या महत्त्वाच्या खटल्यांची सुनावणी घेत आहेत.
आज मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले असताना त्यांनी हार्ले डेव्हीडसनची सुपर बाईक पाहिली.
बाईकची प्रचंड क्रेझ असल्यानं, या धाकड बाईकवर बसण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही.
बाईकच्या मालकाची परवानगी घेऊन सरन्यायाधीश बाईकवर बसले आणि हे दृश्य टिपण्यासाठी सगळ्यांचेच मोबाईल सरसावले.
शरद बोबडे यांना वाचनाचा, फोटोग्राफीचा आणि क्रिकेट खेळण्याचा छंद आहे. त्यासोबतच त्यांची नवी पॅशन आज सगळ्यांना समजली.
याआधी, जानेवारी महिन्यात नागपूर हायकोर्ट बार असोसिएशनच्या एका मैत्रिपूर्ण क्रिकेट सामन्यात सरन्यायाधीशांची बॅटिंग सगळ्यांनी पाहिली होती.
तंत्रशुद्ध फलंदाजीचं दर्शन घडवत त्यांनी ३० चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने १८ धावा केल्या होत्या.