१ ऑक्टोबरपासून राज्यात 'मायक्रो लॉकडाऊन'?; मोदींनी मुख्यमंत्री ठाकरेंना दिला होता सल्ला

By कुणाल गवाणकर | Published: September 28, 2020 06:37 PM2020-09-28T18:37:54+5:302020-09-28T18:41:22+5:30

देशातील कोरोना बाधितांच्या संख्येनं ६० लाखांचा टप्पा ओलांडला आहे. तर मृतांचा आकडा १ लाखांच्या आसपास पोहोचला आहे. त्यात केंद्र सरकारच्या अनलॉक-४ चा कालावधी संपत आला आहे.

१ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत अनलॉक-४ च्या अंतर्गत मेट्रो सेवा सुरू करण्यात आली. याशिवाय इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यासही परवानगी दिली. मात्र राज्यातल्या ठाकरे सरकारनं अद्याप मेट्रो, शाळा सुरू केलेल्या नाहीत.

मोदी सरकारनं अनलॉक-५ ची तयारी सुरू केली आहे. यासंदर्भात नियमावली तयार करण्याचं काम सुरू आहे.

गेल्याच आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सात मुख्यमंत्र्यांशी संवाद झाला. कोरोना रुग्णांची संख्या जास्त असलेल्या मुख्यमंत्र्यांशी बातचीत करून मोदींनी स्थानिक परिस्थितीची माहिती जाणून घेतली.

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मोदींसोबत झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये सहभागी झाले होते. यावेळी मोदींनी 'मायक्रो लॉकडाऊन'वर भर दिला.

कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त असलेल्या भागांमध्ये एक-दोन दिवसांचा लोकल लॉकडाऊन केल्यास तो किती फायदेशीर ठरू शकतो, याचा विचार राज्यांनी करायला हवा, असं मोदींनी सुचवलं होतं.

पंतप्रधान मोदींनी सुचवलेली ही कल्पना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राबवणार का, याकडे आता लक्ष लागलं आहे. लवकरच राज्य सरकार मिशन बिगिन अंतर्गत आपली नवी नियमावली जाहीर करणार आहे.

मोदींनी सुचवलेली मायक्रो लॉकडाऊनची कल्पना ठाकरे सरकार मिशन बिगन अंतर्गत लागू करणार का, याकडे लक्ष लागलं आहे.

मोदींनी सुचवलेली मायक्रो लॉकडाऊनची कल्पना ठाकरे सरकार मिशन बिगन अंतर्गत लागू करणार का, याकडे लक्ष लागलं आहे.

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या १३ लाखांच्या पुढे आहे. देशात राज्य पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळे इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात जास्त निर्बंध लागू आहेत.

Read in English