नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर व सावनेर तालुक्यातील काही भागात वादळी पावसासह तुफान गारपीटसुद्धा झाल्याची माहिती पुढे आली आहे. सध्या शेतकऱ्यांच्या शेतात कोणतेही पीक नसले तरी संत्रा व मोसंबीच्या पिकांचे नुकसान झाले.३ मे रोजी उपराजधानीतील तापमान ४५.३ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. हा यंदाच्या उन्हाळ्यातील तापमानाचा उच्चांक होता. परंतु दुसऱ्याच दिवशी म्हणजे ४ मेपासून अचानक विदर्भातील वातावरणात बदल झाला आहे.या अचानक आलेल्या वादळी पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली होती. या वादळाच्या तडाख्यात रस्त्यावर अनेक झाडे कोसळली शिवाय काही झोपड्यासुद्धा उडाल्याची माहिती आहेआकाशात काळ्या ढगांनी गर्दी करून जोराचे वादळ सुटले शिवाय काहीच वेळात धो धो पावसाला सुरुवात झाली.४५.३ अंशापर्यंत वर चढलेला पारा ४०.४ अंशावर खाली आला असून नागपृरकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.उपराजधानीत आज सायंकाळी जोरदार वादळासह अवकाळी पावसाने ‘एन्ट्री’ केली; शिवाय जिल्ह्यातील काही भागात तुफान गारपीटसुद्धा झाली.