अवकाशात सुपरमून, ब्लुमून आणि ब्लडमून पाहण्याचा दुर्मीळातील दुर्मीळ योग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2018 22:24 IST2018-01-31T22:17:05+5:302018-01-31T22:24:29+5:30

अवकाशातील घटना या मनुष्यासाठी नेहमीच कुतूहलाच्या असतात. (सर्व छायाचित्रे- स्वप्नील साखरे)

आकाशात सुपरमून, ब्लुमून आणि ब्लडमून पाहण्याचा त्रिवेणी संगम आज जुळून आलाय.

31 जानेवारी 2018 म्हणजेच आज अवकाशात खग्रास चंद्रग्रहण (ब्लड मून), सुपरमून आणि ब्लुमून पाहायला मिळतोय.

चंद्र हा आज पृथ्वीपासून सुमारे 3 लाख 58 हजार किलोमीटर अंतरावर आला आहे.

नेहमीपेक्षा 14 टक्के मोठा तर 30 टक्के अधिक तेजस्वी दिसतोय. विशेष म्हणजे उघड्या डोळ्यांनी तुम्हाला चंद्राला पाहता आलंय.

31 मार्च 1866 नंतर पहिल्यांदाच म्हणजे तब्बल 152 वर्षांनी असा योग जुळून आलाय.