Ratnagiri, Tiware Dam Breached: होत्याचे नव्हते झाले! तिवरे धरण दुर्घटनेची हृदय हेलावणारी छायाचित्रे
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2019 13:51 IST2019-07-03T13:29:31+5:302019-07-03T13:51:20+5:30

चार दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटून मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेनंतर अनेक स्थानिक रहिवासी बेपत्ता झाले असून, काही जणांचे मृतदेह हाती लागले आहेत.
मंगळवारी रात्री धरण फुटल्यानंतर मोठ्या प्रमाणावर चिखल आणि पाण्याचा लोंढा गावांच्या दिशेने आला. त्याचा तडाखा सुमारे 12 घरांना बसला.
मोठ्या प्रमाणात आलेल्या पाण्याच्या झोतामुळे आसपासच्या गावातील वस्त्यांचे मोठे नुकसान झाले.
अचानक आलेल्या पुरामुळे अनेक घरांमध्ये पाणी घुसले.
धरण फुटून झालेल्या दुर्घटनेत अनेक कुटुंबातील व्यक्ती वाहून गेल्याने त्यांच्या नातेवाईकांना आक्रोश आवरता येत नव्हता.
दुर्घटनेतून बचावलेल्या अनेकांना एनडीआरएफ आणि स्थानिक लोकांनी घटनास्थळावरून बाहेर काढले.