संतापाचा कडेलोट! धनंजय मुंडेसह संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांचे फोटो लागले मुताऱ्यांमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 16:48 IST2025-03-04T16:40:54+5:302025-03-04T16:48:35+5:30
Santosh Deshmukh Case: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या फोटोनंतर राज्यातील अनेक सार्वजनिक मुतारींमध्ये आरोपींचे फोटो लावण्यात आले आहे.

संतोष देशमुख यांना कशा पद्धतीने मारण्यात आले, त्याचे फोटो समोर आले. त्यानंतर जनक्षोभाची लाट उसळली आहे.
या फोटोनंतर संभाजी ब्रिगेडने राज्यभरातील मुतारींमध्ये आरोपींची फोटो लावले आहेत. यात आमदार धनंजय मुंडे यांचाही फोटोही लावण्यात आला आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात प्रमुख आरोपी असलेला वाल्मीक कराड आणि ज्यांनी त्यांना हालहाल करून मारले, त्या सुदर्शन घुलेसह इतरांचेही फोटो लावण्यात आले आहेत.
संतोष देशमुख यांचे ९ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर आरोपींना त्यांना तब्बल तीन तास हालहाल करून मारले. असह्य वेदना सोसतच देशमुखांना प्राण सोडले.
क्रौर्यालाही लाज वाटावी असे आरोपींनी केले. संतोष देशमुखांना नरक यातना आरोपी त्याचा आनंद घेत होते. फोटो काढत होते.
संतोष देशमुख यांनी पिण्यासाठी पाणी मागितल्यानंतर आरोपीने त्यांच्या तोंडावर लघवी केली. या कृत्याचा निषेध नोंदवण्यासाठी संभाजी ब्रिगेडने आरोपींचे फोटो राज्यभरात अनेक मुतारींमध्ये लावले आहेत.
याच काळा रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीतून संतोष देशमुखांचे अपहरण करण्यात आले. ही गाडी सुदर्शन घुले याची होती. याच गाडीतून त्यांचा मृतदेह दैठणा परिसरात फेकण्यात आला. या गाडीतच रक्ताचे डाग आणि इतर पुरावे सीआयडीला मिळाले.