ऑनलाइन लोकमत शेतकरी संपाच्या दुस-या दिवशीही राज्याच्या विविध भागात शेतीमालाची नासाडी सुरु आहे. आक्रमक झालेले आंदोलक कुठे रस्त्यावर दूध ओतून देत आहेत तर, कुठे भाजीपाला रस्त्यावर फेकला जात आहे. काल पहिल्या दिवशी मुंबईसह अन्य शहरांना या संपाची विशेष झळ जाणवली नव्हती. पण आज मात्र दूध आणि भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. मुंबई, ठाण्याला फळभाज्यांचा पुरवठा करणा-या नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये गाडयांची आवक घटली आहे. दररोज 500 ट्रक भरुन फळभाज्या एपीएमसी मार्केटमध्ये येतात पण आज फक्त 180 गाडया आल्या. यात 49 ट्रक आणि 131 टेम्पो आहेत. ठाणे आणि कल्याणमध्ये भाजीपाल्याची एकही गाडी आलेली नाही.जाणून घ्या कुठे काय चालू आहेनवीमुंबई एपीएमसी भाजी मार्केटमध्ये गुजरात, कलकत्ता, दिल्ली, मध्यप्रदेश येथून भाज्या आल्या. धुळयात शेतकरी संपाच्या दुसऱ्या दिवशी साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे शुक्रवारी आठवडे बाजार न भरविता कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.अहमदनगरच्या राहुरी बाजार समितीमध्ये शुकशुकाट, संपाच्या दुस-या दिवशी गावे बंद, रास्ता रोको करण्यासाठी हालचाली सुरु, आठवडी बाजार बंद.हिंगोली तालुक्यातील खानापूर चित्ता येथे शेतकरी आज संपात सहभागी झाले, दूध व भाजीपाला रस्त्यावर ओतला. यवतमाळ - महागाव तालुक्यातील हिवरासंगम येथे शेतक-यांचा असंतोष दुध व भाजीपाला फेकला रस्त्यावर.नाशिक– शेतकरी संपाच्या दुस-या दिवशी धुळगाव येथे मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळला, शेतकरी संघटना नेते संतु पा झांबरे यांच्या नेतृत्वाखाली शेतक-यांचे आंदोलन दुस-या दिवशीही कायम.दूर शिंगोटे( सिन्नर) येथे बायपास जवळ नारळ,आंबे,टोमॅटो घेवून जात असताना तीन मालट्रक शेतकऱ्यांनी अडवले.सोलापूर - वाखरी (तालुका पंढरपूर) मुख्यमंत्र्याच्या पुतळयास दुधाचा अभिषेक आणि जोडो मार आंदोलन. परभणी शहरातील विद्यापीठ गेट परिसरात दररोज भरणारा भाजीपाला विक्री बाजार आज कडकडीत बंद.यवतमाळ उमरखेड तालुक्यातील मरसुळ फाट्यावर आज अमुल दुध संकलन केंद्राचे वाहने आडवून शेतकऱ्यांनी सर्व दुध रस्त्यावर सांडून दिले शेतकरी संपला उदंड प्रतिसाद.पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकी मार्केटयार्डमधे भाजीपाल्याची फक्त १० टक्के आवक