Shaheed Santosh Mahadik's wife Swati Mahadik is in the Indian Army as lieutenant
शहीद संतोष महाडिक यांची पत्नी स्वाती महाडिक भारतीय सैन्यात लेफ्टनंट पदावर रुजू By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2017 03:10 PM2017-09-09T15:10:36+5:302017-09-09T15:34:08+5:30Join usJoin usNext शहीद संतोष महाडिक यांची पत्नी स्वाती महाडिक भारतीय सैन्यात लेफ्टनंट पदावर रुजू जम्मू काश्मीरच्या कुपवाडामध्ये शहीद झालेले पोगरवाडी (ता. सातारा) येथील कर्नल संतोष महाडिक यांच्या पत्नी स्वाती महाडिक भारतीय सैन्यात रुजू झाल्या आहेत. शहीद संतोष महाडिक यांची पत्नी स्वाती महाडिक भारतीय सैन्यात लेफ्टनंट पदावर रुजू शहीद संतोष महाडिक यांच्या अंत्यविधीवेळीच त्यांनी भारतीय सैन्यात जाऊन देशसेवा करण्याचा निर्धार केला होता. त्यांनी आपली ही शपथ पुर्ण केली असून सैन्यात लेफ्टनंट म्हणून रुजू झाल्या आहेत. शहीद संतोष महाडिक यांची पत्नी स्वाती महाडिक भारतीय सैन्यात लेफ्टनंट पदावर रुजू 17 नोव्हेंबर 2015 रोजी कुपवाडा येथे 41 राष्ट्रीय राईफल्स बटालियनचे नेतृत्व करताना दहशतवाद्यांच्या हल्ल्यात कर्नल संतोष महाडिक शहीद झाले होते. शहीद संतोष महाडिक यांची पत्नी स्वाती महाडिक भारतीय सैन्यात लेफ्टनंट पदावर रुजू शहीद संतोष महाडिक यांच्या शौर्याबद्दल त्यांना मरणोत्तर ‘शौर्यचक्र’ पुरस्कारही दिला गेलाशहीद संतोष महाडिक यांची पत्नी स्वाती महाडिक भारतीय सैन्यात लेफ्टनंट पदावर रुजू चेन्नईतल्या ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीतील कार्यक्रमात स्वाती महाडिक यांनी लेफ्टनंटपदाची शपथ घेतली. या सोहळ्यासाठी महाडिक कुटुंबीयांसह स्वाती यांच्या माहेरची मंडळीही चेन्नईत उपस्थित होती. शहीद संतोष महाडिक यांची पत्नी स्वाती महाडिक भारतीय सैन्यात लेफ्टनंट पदावर रुजू ‘सैन्यात भरती होणं,’ या एकाच उद्देशाने झपाटून गेलेल्या स्वाती महाडिक या प्रशिक्षणार्थींमध्येही अव्वल राहिल्या. चेन्नई येथे शुक्रवारी प्रशिक्षण तळावर झालेल्या कौतुक सोहळ्यात ‘बेस्ट कॅडेट’ म्हणून मिळालेलं पदक कुटुंबीयांना दाखविताना त्यांच्या भावना अनावर झाल्या होत्या.शहीद संतोष महाडिक यांची पत्नी स्वाती महाडिक भारतीय सैन्यात लेफ्टनंट पदावर रुजू स्वाती यांनी पुणे विद्यापीठातून पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यांना मिलिट्रीमध्ये दाखल होण्यासाठी तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर आणि लष्करप्रमुख जनरल दलबीर सिंह यांनी वयाची अट शिथील केली होती.शहीद संतोष महाडिक यांची पत्नी स्वाती महाडिक भारतीय सैन्यात लेफ्टनंट पदावर रुजू स्वाती महाडिक यांच्यासोबत सैन्यात लेफ्टनंट म्हणून रुजू झालेय्या वीरपत्नी निधी दुबे. निधी दुबे यांचे पती मुकेश दुबे शहिद झाल्यानंतर त्यांनीही सैन्याच भरती होण्याचा निर्धार केला होता. टॅग्स :भारतीय जवानIndian Army