शिवजयंती: छत्रपती शिवाजी महाराज प्रत्यक्षात कसे दिसत होते?; जगभरातील 'ही' चित्रे, नक्की बघा By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2020 05:33 PM 2020-02-19T17:33:32+5:30 2020-02-19T17:42:13+5:30
शिवजयंती: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. शिवाजी महाराजांबद्दल जाणून घ्यायला प्रत्येक शिवप्रेमींना आवडत असते. शिवाजी महाराज नेमके कसे दिसायचे हे पाहण्याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. जगभरातील संग्रहालयात शिवरायांची अनेक जुनी चित्रे आढळतात, यात काही महाराज हयात असताना काढली असल्याचं दावा करण्यात येतो. मात्र बहुतांश चित्रे महाराजांच्या मृत्यूनंतर काढण्यात आली आहेत.
साधारणपणे १८ व्या शतकात काढलेलं हे चित्र, बडोदा संस्थानच्या संग्रहालयात आहे. त्यात एका हातात फूल तर डाव्या हातात पट्टा अन् कमरेला ढाल आहे.
शिवरायांची खूप कमी जुनी छायाचित्रे उपलब्ध आहेत. यामध्ये मॉस्को येथील संग्रहालयात ठेवलेले हे छायाचित्र
१८७२ मधील रॉबर्ट आर्म यांच्या Historical Fragments या पुस्तकात हे चित्र छापलं आहे.
किशनगड येथील महाराज सावंतसिगं यांचे चित्रकार निहाल चंद्र यांनी १७५० मध्ये हे चित्र काढलं. यात राजांच्या उजव्या हातात तलवार आणि डाव्या हातात दानपट्टा दाखवण्यात आला आहे. हे चित्र लंडनमधील बॉनहॅम्सच्या संग्रहालयात आहे.
फ्रांस्वा वॅलेंटीन या डच अधिकाऱ्यांच्या संग्रहालयातील हे चित्र १७६२ मध्ये प्रसिद्ध झाले असून यावर Den Heer Seva Gi असं लिहिलं आहे.