ऑनलाइन लोकमत - लोणावळा, दि. 26 - मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर कामशेतजवळ भिषण अपघात झाला आहे. पवना पोलीस चौकीजवळ झालेल्या भीषण कार अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. भरधाव वेगात जात असताना कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार पलटी झाली. अपघात इतका भीषण होता की 6 जणांचा मृत्यु झाला आहे. कामशेत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास MH 14 EU 7038 क्रमांकाची मारुती सुझुकी सियाज कार कामशेत हद्दीत भरधाव वेगात जात होती. यावेळी चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि गाडी पलटी झाल्याने भीषण अपघात झाला. अपघात तिघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात मृत पावलेले सर्व जण पुण्यातील बावधन येथील असल्याचे प्राथमिक तपासात समोर आलं असल्याची माहिती कामशेत पोलिसांनी दिली आहे. मयत व जखमी साधारण २५ ते २८ वयोगटातील आहेत. धायरीच्या सिंहगड कॉलेजचे हे सर्व विद्यार्थी असल्याची माहिती रुग्णालयाने दिली आहे. कामशेतचे पोलीस निरीक्षक आय.एस. पाटील पुढील तपास करत आहेत.मृतांची ओळख पटली असून आदित्य भंडारकर, यश सिराली, अभिषेक रॉय, अक्षय भिलारे आणि जॉकी सैमुअल अशी त्यांची नावे आहेत.