Start of kite festival for Makar Sankranti
मकरसंक्रांतीनिमित्त पतंगोत्सवाला सुरुवात By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2018 11:17 PM2018-01-05T23:17:09+5:302018-01-05T23:19:56+5:30Join usJoin usNext ‘तीळगूळ घ्या गोड गोड बोला’ म्हणत नववर्षातील पहिला सण अर्थात मकरसंक्रांत सणाची सगळीकडेच लगबग सुरू आहे. मकरसंक्रांत साजरा करण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक असून, आबालवृद्धही त्यासाठी जंगी तयारीला लागले आहेत. मकरसंक्रांतीच्या निमित्तानं पतंगोत्सवालाही सुरुवात झाली आहे. निरनिराळ्या रंगातील पतंग अनेक पतंगप्रेमींचं लक्ष वेधून घेत आहेत. पतंगोत्सवानिमित्त अनेकांना एकमेकांच्या पतंग काटण्याची संधी मिळते परंतु पतंगाला बांधलेला धारदार मांजा पक्ष्यांसह इतरांच्या जिवावर बेतणार नाही, याची काळजी पतंगप्रेमींना घ्यावी लागणार आहे. पतंगप्रेमींनी मोकळ्या मैदानांवर, शहरापासून दूर अंतरावरील मोकळ्या माळरानात जाण्याचा बेत आखलेला दिसतोय.