Teacher's Degree in the State for Implementation of Proposals
मान्य मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी राज्यभर शिक्षकांचा एल्गार By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2017 07:39 PM2017-12-08T19:39:14+5:302017-12-08T19:49:41+5:30Join usJoin usNext महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने आपल्या मागण्यांच्या पुर्ततेसाठी पाच टप्प्यात आंदोलन पुकारले आहे. त्यातील पहिल्या टप्प्यात आज राज्यातील सर्व तहसील कार्यालयांवर धरणे आंदोलन करण्यात येत आहे. महासंघाच्या पदाधिकाऱ्यांकडून आज सर्व आमदारांना निवेदने देण्यात येत आहेत. आंदोलनाचा हा पहिला टप्पा असून अखेरच्या टप्प्यात बारावीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला आहे. महासंघाचे अध्यक्ष प्रा.अनिल देशमुख यांनी हा इशारा दिला दिला आहे. मुक्ताईनगर,जिल्हा जळगाव येथील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देतांना. नंदुरबार येथील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देताना.टॅग्स :शिक्षकमहाराष्ट्रTeacherMaharashtra