ठाणे ते दिवा रेल्वेमार्गाच्या दोन्ही बाजूचे रुपडे पालटणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2017 16:55 IST2017-12-12T16:51:16+5:302017-12-12T16:55:28+5:30

ठाणे ते दिवा रेल्वेमार्गाच्या दोन्ही बाजूचे रूपडे पालटणार आहे.
दोन्ही बाजूला इतस्ततः पडलेला कचरा, डोळ्यांत भिनणारे बकालपण, पडिक भिंतीवरील अवाचनीय संदेश आता हटवून आता स्टेशन परिसर स्वच्छ करण्यात येणार आहे.
साधारणतः रेल्वे ट्रॅकच्या दोन्ही बाजूला अस्वच्छतेचं दिसणारं चित्र लवकरच दिसेनासे होणार आहे.
महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आज ठाणे ते दिवा आणि दिवा ते ठाणे असा चक्क रेल्वेने प्रवास केला.
आयुक्त संजीव जयस्वाल यांनी रेल्वेच्या दुतर्फा असलेला कचरा साफ करून तिथे रंगरंगोटी आणि पेंट दि वॉल मोहीम राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
ठाण्यात अशा पद्धतीने राबविण्यात येणारा भारतातील हा पहिलाच प्रयोग ठरणार आहे.