'लालबागचा राजा'च्या चरणी आज नेत्यांची रांग! अमित शाहांच्या आधी शरद पवार नात-जावयासोबत पोहोचले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2024 01:43 PM2024-09-09T13:43:52+5:302024-09-09T14:03:09+5:30

Sharad Pawar Amit Shah Visit Lalbag Raja : आज केंद्रीय मंत्री अमित शाह, खासदार शरद पवार यांनी मुंबईतील लालबागच्या राजाचे दर्शन घेतले.

Sharad Pawar Amit Shah Visit Lalbag Raja : गणेशोत्सव काळात मुंबईतील लालबागच्या राजाच्या दर्शनाला देशभरातून भाविक येत असतात. यात राजकीय नेते, सेलिब्रिटी यांचाही समावेश असतो.

आज लालबागच्या दर्शनाला व्हीआयपींची मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. आधी खासदार शरद पवार यांनी त्यांच्या कुटुंबियांसह दर्शन घेतलं, त्यांच्यानंतर केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी सहकुटुंब लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं.

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गणरायाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. आज सकाळीच खासदार शरद पवार यांनी दर्शन घेतलं.

खासदार शरद पवार यांच्यासोबत त्यांचे जावई सदानंद सुळे आणि त्यांची नात रेवती सुळे उपस्थित होत्या.

खासदार शरद पवार याआधी मुख्यमंत्री असताना आणि कोरोना काळात रक्तदान शिबीरावेळी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आले होते.

आज खासदार शरद पवार यांनी मुंबईतील अन्य गणपती मंडळांनाही भेटी दिल्या. पवार यांनी लालबागसह चिंचपोकळीच्या चिंचपोलळीच्या चिंतामणीचं दर्शन घेतलं.

खासदार शरद पवार यांच्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं.

यावेळी शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा नेते आशिष शेलारही उपस्थित होते.