ऑनलाइन लोकमत उदगांव ( कोल्हापूर ), दि. 27 - महाराष्ट्र, कर्नाटकसह अनेक राज्यांत प्रसिद्ध असलेली कोल्हापूर जिल्ह्यातील उदगावची जोगेश्वरी यात्रेत पारंपरिक मुकुट खेळवण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्याचा अनुभव घेण्यासाठी लाखो भाविकांनी हजेरी लावली होती. श्री जोगेश्वरी यात्रेच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी 6 ते दुपारी 12 वाजेपर्यत मुकुट खेळवण्याचा पारंपरिक कार्यक्रम असतो. या सोहळ्यात बारा बलुतेदार सहभागी असतात. जोगेश्वरी मंदिरापासून ते महादेवी मंदिरापर्यत मुकुट खेळवले जातात. दरम्यान हा पांरपरिक कार्यक्रम पाहण्यासाठी लाखो भाविकांनी हजेरी लावली होती. या सोहळ्याला गालबोट लागू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. (फोटो क्रेडिट - ओंकार)