ऑनलाइन लोकमत ठाणे, दि. 6 - ठाणे-मुंब्रा बायपास रोडवर गुरुवारी पहाटेच्या सुमारास दरड कोसळली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. पहाटे चार ते साडेचारच्या दरम्यान कौसा येथील रेहमानिया हॉस्पिटलजवळ ही घटना घडली. मोठमोठे दगड रस्त्यावर आल्यामुळे या मार्गावरुन वाहतुकीचा वेग मंदावला होता. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जेसीबीच्या सहाय्याने ही दरड हटवली. ठाणे-मुंब्रा बायपास रोडवर वाहतूक आता पूर्ववत झाली आहे. आणखी वाचा नऊ दिवस तो राहिला लहान भावाच्या मृतदेहासोबतमधुर भांडारकरच्या तोंडाला काळं फासणाऱ्याला 1 लाखांचं बक्षीसनाशिकच्या ब्रेन डेड तरुणामुळे 13 जणांना मिळणार नवीन जीवन मुंब्रा बायपास मार्ग जिथून जातो तिथे डोंगराळ भाग आहे. सुरक्षेच्या दृष्टीने इथे कोणत्याही उपायोजना केलेल्या नाहीत. यापूर्वी सुद्धा पावसाळयात इथे दरड कोसळण्याच्या काही घटना घडल्या आहेत. पण त्यानंतरही प्रशासनाने खबरदारी म्हणून कोणतीही पावले उचलली नाहीत. दरड कोसळल्यामुळे पावसाळयात या मार्गावरुन प्रवास धोकादायक असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. फोटो सौजन्य - विशाल हळदे https://www.dailymotion.com/video/x84577z