ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 6 - मराठा आरक्षण आणि कोपर्डी घटनेतील नराधमांना शिक्षा करा, या मागणीसाठी देशाची आर्थिक राजधानी मुंबईत रविवारी मराठा क्रांती मूक मोर्चाची बाईक रॅली धडाडली. चेंबूरहून सुरू झालेली बाईक रँली सीएसटीला पोहोचली, तरी रॅलीचे शेवटचे टोक चेंबूरमध्ये होते. यावरून रॅलीमध्ये रेकॉर्डब्रेक गर्दी झाल्याचा दावा रॅलीचे मुख्य संयोजक वीरेंद्र पवार यांनी केला.राज्यभर निघणाऱ्या मूक मोर्चांप्रमाणेच बाईक रॅलीमध्येही शिस्तबद्धता दिसून आली. सुमारे १० वाजण्याच्या सुमारास रॅलीला सोमय्या मैदानावरून सुरुवात झाली. सायन, माटुंगा, लालबाग, भायखळा मार्गे रॅली तासाभरातच सीएसटीला पोहोचली. मुंबई मनपा मुख्यालयासमोर स्थापित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला वंदन करून बाईक नॉनस्टॉप सुरूच होत्या. दरम्यान मुंबई पोलीस आणि वाहतूक पोलीस यांच्या नियोजनामुळे वाहतूक सुरळीत सुरू होती. संपूर्ण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर झिरो पार्किंग करण्यात आले होते. त्यामुळे एकाही ठिकाणी रॅलीला अडथळा निर्माण झाला नाही. जे जे उड्डाणपुलावरून भायखळ्यातील खडा पारसी येथे रॅलीची सांगता झाली आहे. नेत्यांची गर्दीआमदार भाई जगताप, भरत गोगावले यांच्यासह विनोद घोसाळकर, अभिनेता सुशांत शेलार यांसह अनेक नेते व सेलिब्रिटी या मोर्चात सामील झाले होते. तर मुंबईच्या डबेवाल्यांसह लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासारख्या अनेक संघटना आणि मंडळांचे पदाधिकारी रॅलीत सहभागी झाले.मराठा क्रांती मोर्चामुळे वाहतूक कोंडीमराठा क्रांती मोर्चाची रविवारी मुंबईत बाईक रॅली निघाली होती. यामध्ये मोठी गर्दी होणार असल्याने वाहतूक पोलिसांनी मुंबईत जाणारी सर्व वाहतूक प्रिय दर्शनी सर्कल येथे बंद करुन ही वाहतूक वडाळा मार्गावरुन पळवली होती. त्यामुळे ठाणे-मुंबई आणि पनवेल -सायन मार्ग पूर्णपणे ठप्प झाला होता. या रॅलीमध्ये ४० ते ५० हजार दुचाकी सहभागी झाल्या असल्याचा दावा अयोजकांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे आज संपूर्ण मुंबईत चक्काजाम झाला होता. https://www.dailymotion.com/video/x844h1a