ऑनलाइन लोकमतठाणे, दि. 7 - हिटलरचा आदर्श मानून केंद्रातले भाजप सरकार लोकशाहीची हत्या करू पाहत आहे. ज्या घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेमध्ये पत्रकारांवर लोकशाहीच्या चौथ्या खांबाची धुरा सोपविलेली, तो चौथा खांब हे सरकार नेस्तनाबूत करू पाहत आहे. आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधीला धडा शिकविणारी ही जनता आता केंद्रातल्या सरकारलाही धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. लोकशाहीची हत्या होऊ देणार नाही, असा इशारा आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिला. ठाणेकरांच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात गडकरी रंगायतन ते जिल्हाधिकारी कार्यालयादरम्यान कँडल मार्च काढण्यात आला. यावेळी ते बोलत होते.एनडीटीव्ही या वृत्तवाहिनी या वृत्तवाहिनीवर केंद्र सरकारने बंदी घातली होती. त्यावरील बंदी सरकारने कँडल मार्चची दाखल घेऊन उठविली. मात्र सरकारच्या या हुकूमशाहीच्या निषेधार्थ सोमवारी ठाणेकरांनी कँडल मार्च काढून ठाणेकरांच्यावतीने निषेध नोंदविला. येथील गडकरी रंगायतनामधून हा मार्च निघाला. हातात पेटत्या मेणबत्या घेऊन ठाणेकर नागरिक हाताला काळ्या रिबन बांधून हा मार्च जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जमला. यावेळी निवृत्त न्यायाधीश गुलाबराव अवसरमोल, आमदार आव्हाड, डॉ. राम माळी, आनंद परांजपे, डॉ.अभिजीत वैद्य, संजय भोईर, ऋता आव्हाड, मुख्याध्यापिका आमला स्टॅन्ले विक्रांत चव्हाण, शानू पठाण, अमित सरैय्या, सुहास देसाई आदींसह तरुण तरुणी ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.(छाया- विशाल हळदे)