नंदकिशोर नारेल्ल / ऑनलाइन लोकमतवाशिम, दि. 27 - पंचायत समिती कार्यालयात अधिकारी उशिरा येणे व लवकर निघून जाण्याचा प्रकार नियमित झाला असल्याने येथे येणा-या ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागतो. या संदर्भात लोकमतने २६ ऑगस्ट रोजी दुपारी ४.३० वाजताच्या दरम्यान स्टिंग ऑपरेशन केले असता कार्यालयातील जवळपास सर्वच अधिकारी व कर्मचारी यांच्या खुर्च्या खाली आढळून आल्यात. वाशिम पंचायत समितीमध्ये यापूर्वीही असाच प्रकार घडला होता. तेव्हाचे सभापती विरेंद्र देशमुख यांनी अधिकारी व कर्मचाºयांना चांगलेच धारेवर धरून कारणे दाखवा नोटीसेस सुध्दा बजावण्यात आल्या होत्या. त्यानंतर सुरळीत कामकाज सुरु असतांनाच पुन्हा अधिकारी , कर्मचारी वेळेवर हजर न राहणे, लवकर निघून जाण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. अनेक अधिकारी कर्मचारी अकोल्यासह बाहेरगावाहून येणे जाणे करीत असलयने त्यांना कार्यालयात पोहचण्यासाठी उशिर होतो तर कधी रेल्वे, बसची वेळ झाल्याने लवकर निघून जात असल्याने शुक्रवारी हा प्रकार घडल्याची माहिती पुढे आली आहे. शुक्रवारी स्वच्छ भारत मिशन, मुख्य कार्यकारी अधिकारी व नियामक मंडळाची मिटींग असल्याची माहिती असून यासाठी काही अधिकारी व कर्मचारी गेले असावेत. असे असले तरी कार्यालयातील लिपिक, कर्मचारी तसेच कृषी विभागासह असलेल्या ईतर विभागाचे कर्मचारी कोठे होते असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.