weaver bird nest
'पिल्लं निजती खोप्यात जसा झुलता बंगला' पाहा सुगरणीचे कौशल्य By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2018 10:18 AM2018-07-14T10:18:46+5:302018-07-14T10:23:57+5:30Join usJoin usNext कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनाही या सुगरणीच्या खोप्याने भुरळ घातली आहे. सुगरणीचे हे कौशल्य त्यांनी आपल्या कवितेतून असे वर्णिले आहे, 'अरे खोपामधी खोपा सुगरणीचा चांगला, पहा पिल्लांसाठी तिनं झोका झाडाला टांगला' (सर्व फोटो : प्रशांत खरोटे) निसर्गाने प्रत्येक सजीवाकडे आगळेवेगळे कौशल्य दिले आहे. माणुस जरी बुध्दिमान प्राणी असला तरी काही मुक्या जीवांकडे असलेले कौशल्य हे वाखाण्याजोगे असेच आहे. निसर्गाने प्रत्येक सजीवाकडे आगळेवेगळे कौशल्य दिले आहे. माणुस जरी बुध्दिमान प्राणी असला तरी काही मुक्या जीवांकडे असलेले कौशल्य हे वाखाण्याजोगे असेच आहे. सुगरणीसारख्या या लहानश्या पक्ष्याकडे असलेले खोपा विणकामाचे कौशल्य अन्य कुठल्याही पक्ष्यामध्ये आढळून येत नाही. पावसाच्या सरींचा वर्षाव आता सर्वत्र होऊ लागला असून नाशिक शहर व परिसरही ओलाचिंब होत आहे. वृक्षराजी न्हाऊन निघाली असून सुगरणीच्या घरट्यांचे सौंदर्य यामध्ये खुलून दिसत आहे.