ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 27 - बॉलिवूडसह हॉलिवूडमध्ये आपल्या अदांचा जलवा दाखवण्याऱ्या देसी गर्ल प्रियंका चोप्राने आपल्या घरी एका पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीला बॉलिवूडमधील बऱ्यच कलाकारांनी हजेरी लावली होती. प्रियंका चोप्राच्या या पार्टीत मनसे अक्ष्यक्ष राज ठाकरेंनी उपस्थिती दर्शवल्यामुळे अनेक चर्चेला उधान मिळाले आहे.प्रियंका चोप्रा आपल्या पहिल्या हॉलिवूडपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. तिचा पहिला हॉलिवूडपट बेवॉच लवकरच प्रदर्शित होणार आहे. पिसीने चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मुंबईतल्या जुहू भागातील एस्टेला पबमध्ये प्रियंकाने एक पार्टी आयोजित केली होती. यावेळी राजकीय क्षेत्रातून राज ठाकरेंनी आपली उपस्थिती दर्शवली. त्याचप्रमाणे सिनेसृष्टीतील रेखा, कंगना रनौत, ऋषी कपूर, अनिल कपूर, माधुरी दीक्षित आणि पती श्रीराम नेने, सुष्मिता सेन, ईशा गुप्ता, तमन्ना भाटिया, सोफी चौधरी, फरहा अली खान, कुणाल कोहली, अब्बास-मस्तान, ओमंग कुमार, आशुतोष गोवारीकर, रमेश तौरानी, सुभाष घई आणि विधू विनोद चोप्रा या कलाकारांनी उपस्थिती लावली.