World Photography Day: महाराष्ट्रातील 'हे' निसर्गरम्य पर्यटनस्थळ माहितीयं का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2021 15:25 IST2021-08-19T15:00:31+5:302021-08-19T15:25:58+5:30
आज वर्ल्ड फोटोग्रामी डे आहे, त्यानिमित्त महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांची काही छायाचित्र आपणाला दाखवत आहोत. निसर्ग सौंदर्य आणि ऐतिहासिक वास्तूंना नटलेला महाराष्ट्र पाहा.

आज वर्ल्ड फोटोग्रामी डे आहे, त्यानिमित्त महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांची काही छायाचित्र आपणाला दाखवत आहोत. निसर्ग सौंदर्य आणि ऐतिहासिक वास्तूंना नटलेला महाराष्ट्र पाहा.
औरंगाबाद जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या अंजंठा आणि वेरुळच्या लेणी पाहायला दूर-दूरहून पर्यटक येतात. विदेशी पर्यटकही येथील लेण्याना पाहून फोटो काढून नेतात.
अजिंठा आणि वेरूळ लेणी या एकाच दगडात कोरून बनवण्यात आलेल्या प्राचीन लेण्यांपैकी एक आहेत.
महाराष्ट्राची राजधानी मुंबई हे आर्थिकदृष्ट्या देशातील सर्वात मोठं शहर असून पर्यटनासाठीही येथे गर्दी होते. मुंबईचं सीएसएमटी रेल्वे स्थानक आणि मुंबई महापालिका हेही पर्यटनाचंच ठिकाण मानलं जातं
ढगाळ वातावरण, नैसर्गिक तलावांत खेळण्याचा आनंद, हनुमान मंदिरात शांतता आणि प्रसन्नता शोधणे, चित्तथरारक दृश्ये, घनदाट जंगले, फेसाळते धबधबे आणि पावसाळा. त्रिंगलवाडी किल्ल्यावरील ट्रेकला या सर्व गोष्टींचा अनुभव घ्या.
अंजठा वेरुल लेणीतील ऐतिहासिक वास्तूचं हे ठिकाण आहे, या वास्तूला आंतरराष्ट्रीय पर्यटनाचा दर्जा देण्यात आला आहे
पावसाळ्यात चहा, कुंद वातावरण आणि काही मनमोहक दृश्ये देवकुंड धबधब्यावरील हे क्षण कसे असतील.
अंजनेरी टेकडी इतर लोकप्रिय ट्रेकिंग स्थळांपासून वेगळी आहे कारण या टेकडीचा रामायणाची संबंध आहे.
साहसीप्रेमींसाठीच नव्हे तर आध्यात्मिक तीर्थक्षेत्राची आवड असणाऱ्या रसिकांसाठी देखील ही टेकडी लोकप्रिय आहे.
मालवण येथील लोकप्रिय तारकर्ली समुद्रकिनाऱ्यावरील साहसी खेळांचा अनुभव म्हणजे प्रत्येक समुद्रप्रेमींसाठी एक स्वर्गच जणू.
येथे वॉटर स्पोर्ट्सपासून डॉल्फिन सफारी आणि डॉल्फिन पाहण्याच्या जादुई अनुभव, सर्व काही या समुद्रकिनाऱ्यावर आहे. महाराष्ट्र टुरिझमच्या अधिकृत ट्विटरवरुन हे फोटो शेअर करण्यात आले आहेत.