तु ये रे पावसा, 'गेला पाऊस कुणीकडे'... By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 09:55 PM 2019-07-24T21:55:43+5:30 2019-07-24T22:03:32+5:30
राज्यातील १०९ लाख ८२ हजार हेक्टरवरील पेरण्या झाल्या असल्या तरी पुरेसा पाऊस न झाल्याने मोठ्या प्रमाणातील क्षेत्रावर पेरण्या झाल्या नाहीत.
राज्यात १ ते २२ जुलै या कालावधीत सरासरी ५०९ मिलिमीटर पाऊस होतो. यंदा तो ३८६.६० (७५.३६ टक्के) इतका झाला आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यातील पावसाचे प्रमाण अतिशय कमी आहे. त्यामुळे शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसला आहे.
आभाळ पांढरफट्ट पडलं आहे, पावसाचा लवलेशही नाही तर हवामान खात्याचा अंदाजही फोल ठरतोय.
पाऊस नसल्याने गेला पाऊस कुणीकडे अशी म्हणण्याची वेळ ग्रामीण भागातील नागरिकांवर आली आहे. पाऊस नसल्याने ग्रामीण भागातील बाजारपेठाही ठप्प झाल्या आहेत.
मुंबईसह कोकणात मोठ्या प्रमाणावर पाऊस आहे. मात्र, मुंबईत राहणाऱ्या नोकरदारांच्या गावाकडे पावसाने पाठ फिरवली आहे. म्हणूनच फोनवर आई-वडिलांशी बोलताना उत्तर माहिती असूनही पाऊस-पाणी कसंय विचारताना शब्द जड होतात.
आभाळात काळे ढग साचतात तेव्हा बळीराजा सुखावतो, वरुण राजाची कृपीदृष्टी होईल असे वाटून आनंदित होतो. पण, काही वेळातच हे काळे ढग नाहीसे होतात.
अमरावतीमध्ये कपाशीच्या पिकाला चक्क विकतचं थेंब थेंब पाणी आणून शेतकऱ्याने दिलंय. अगदी काळीज हेवालणार हे दृश्य कॅमेऱ्यात कैद झालंय.